शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यूजीसीच्या परिपत्रकाला खो; कॉलेजची मान्यता रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:25 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा कॉलेजची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे.

ठळक मुद्देसिनेट सदस्याची मागणीऑनलाइन शिक्षणाद्वारे अभ्यासक्रम पूर्ण व्हावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा कॉलेजची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. तसेच ऑनलाइन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून मनीष गवई यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, समस्या, परीक्षांबाबत अवगत केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी यूजीसीने परीक्षा, ऑनलाईन अभ्यासक्रम याबाबत गाइड लाइन जारी केले होते. यूजीसीच्या या परिपत्रकाची कॉलेजस्तराहून अंमलबजावणी होणे आवश्यक होते. तथापि, अमरावती विद्यापीठाशी संलग्नित ३९४ महाविद्यालयांनी यूजीसीच्या परिपत्रकाला खो दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने नुकतेच परिपत्रक जाहीर करण्यात आले. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या परिपत्रकाला महाविद्यालयांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. यूजीसीच्या परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे.ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावाकोरोनाने देशभरात 'लॉकडाऊन' केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग कक्ष बंद आहेत. विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत व परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयांच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था करावी आणि वेगवेगळ्या ऑनलाइन पद्धतीचा वापर करून अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही आणि शैक्षणिक वर्षांमध्ये त्यांची पदवी पूर्ण होईल, असे निवेदनातून म्हटले आहे.विद्यापीठाने ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अगोदरच तयारी केली आहे. प्राचार्यांची जिल्हानिहाय ऑनलाईन बैठकी झाल्या आहेत. आता केवळ शासनाकडून परीक्षांच्या तारखांची प्रतीक्षा आहे.- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र