बियाणे विक्रीवर करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 11:39 PM2018-04-17T23:39:05+5:302018-04-17T23:39:14+5:30

यंदाचा खरीप हंगाम दोन महिन्यांवर आलेला आहे. बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा फसवणूक होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.

Look at the sale of seeds | बियाणे विक्रीवर करडी नजर

बियाणे विक्रीवर करडी नजर

googlenewsNext
ठळक मुद्देखरिपासाठी दक्षता : सावधान, बोगस बियाण्यांचा बाजारात शिरकाव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाचा खरीप हंगाम दोन महिन्यांवर आलेला आहे. बी- बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आदी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, अन्यथा फसवणूक होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.
गुणवत्ता व दजार्ची हमी देणाºया अधिकृत विक्रेत्याकडून कृषी निविष्ठांची खरेदी करावी. बनावट व भेसळयुक्त बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टण, पिशवी, टॅग, खरेदीची पावती बियाणे कापणी होईपर्यंत जपून ठेवावीे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पाकीट सीलबंद-मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घेणे आवश्यक आहे. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास तक्रारीसाठी जवळच्या कृषी अधिकारी किंवा कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. कीटकनाशके अंतिम मुदतीच्या आत असल्याची खात्री करावी. या खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची पेरणी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे. बाजारात विविध कंपन्यांचे सत्यतादर्शक बियाणे विक्रीला उपलब्ध राहण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी खरेदी करतेवेळी अधिकृत बियाणे विक्रेत्याकडूनच खरेदी करून रितसर पावती घ्यावी. सोयाबीन पेरणीकरिता आपले स्वत:चे घरच्या बियाण्याची घरीच उगवणशक्ती तपासून खात्री करावी. बियाण्याच्या बाबतीत गाव पातळीवर कुठल्याही अनाधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषी निविष्ठा खरेदी करु नये, याद्वारे फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे, असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
बेकायदेशीर बियाण्यांमुळे कारवाईस समस्या
बाजारात राऊंडअप बीटी, एचटी बीटी, बीजी-३ अशा प्रकारच्या कापूस बियाण्याची खाजगी व्यक्तींमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याची चर्चा आहे. केंद्र शासनाने कोणत्याही कंपनीस तणनाशक प्रतिकारक्षम जनुकीय कापूस बियाणे विक्रीची परवानगी दिलेली नाही. अनधिकृत मार्गाने खरेदी केलेले जनुकीय बियाणे पर्यावरण कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईस पात्र ठरत असल्याने अशा बियाण्याची लागवड शेतकऱ्यांसाठी पुढे कायदेशीर समस्या निर्माण करू शकते.
बीटीच्या विशिष्ट वाणाचा आग्रह नसावा; कृषी विभागाचे आवाहन
शेतकऱ्यांनी विशिष्ट बीटी कपाशी वाणाचा आग्रह धरू नये. सर्वच बीटी कपाशी उत्पादनक्षमता सारखीच आहे. त्यासाठी योग्य मशागतीच्या पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. रासायनिक खताच्या किमतीमध्ये वेळोवेळी बदल होत असल्याने बॅगवरील छापील किमतीपेक्षा जास्त किमतीत रासायनिक खत विकत घेऊ नये. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीजवळून गावपातळीवर दुय्यम मूलद्रव्ये, बिगर नोंदणीकृत सूक्ष्म मूलद्रव्ये, पीकवाढ संजीवके, जैविक कीटकनाशके इत्यादी प्रकारची उत्पादने खरेदी करू नये.

Web Title: Look at the sale of seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.