शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या ५५० उन्हाळी पेपरला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 17:18 IST

वेळापत्रक लांबणार : आठ दिवसांच्या परीक्षेत बदल; मतमोजणीच्या दिवशीचे पेपर पुढे घेणार

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या १ एप्रिलपासून प्रारंभ होणाºया उन्हाळी परीक्षेत ५५० पेपरला लोकसभा निवडणुकीचा फटका बसला आहे. आठ दिवसांच्या परीक्षेत बदल करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.

 केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. दुसरीकडे विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा १ एप्रिल ते २६ मे या कालावधीत निश्चित  केली असून, चार लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.  ११, १८ व २३ एप्रिल रोजी नियोजित पेपरच्या दिवशी मतदान, तर २३ मे रोजी मतमोजणी होत आहे. त्यामुळे ५५० पेपर पुढे ढकलले जातील, अशी माहिती परीक्षा वेळापत्रक नियोजक मिलिंद देशपांडे यांनी सांगितले. 

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कार्यक्षेत्रात यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला व अमरावती हे पाच जिल्हे येतात. लोकसभेच्या धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वेचा समावेश असलेला वर्धा, मोर्शीचा काही भाग येणारा रामटेक आणि यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांची निवडणूक ११ एप्रिल रोजी होणार आहे, तर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १८ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. मलकापूर तालुका समाविष्ट असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणूक मतमोजणी आहे. या दिवसांचे पेपरदेखील पुढे घेण्यासंदर्भात प्रशासनाने तयारी केली आहे.    

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उन्हाळी परीक्षांच्या तारखेत बदल करण्याची तयारी चालविली आहे. १०, ११ व १२ आणि १८, २३, २३, २४ एप्रिल आणि २३ मे अशा आठ दिवसांचे पेपर पुढे घेतले जातील.     - हेमंत देशमुख,     संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :Amravatiअमरावतीuniversityविद्यापीठ