शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Lok Sabha Election 2019; ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ‘सील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 01:29 IST

लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी पार पडली. त्यानंतर जीपीएस यंत्रणा असलेल्या ३९ ट्रकमधून ईव्हीएम शुक्रवारी दुपारपर्यंत बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामातील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने येथे त्रिस्तरीय तगडा बंदोबस्त आहे.

ठळक मुद्देत्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था : पोलिसांचा सशस्त्र पहारा, सीआरपीएफ, एसआरपीएफच्या तुकड्या तैनात

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभेच्या अमरावती मतदारसंघाची निवडणूक गुरुवारी पार पडली. त्यानंतर जीपीएस यंत्रणा असलेल्या ३९ ट्रकमधून ईव्हीएम शुक्रवारी दुपारपर्यंत बडनेरा मार्गावरील नेमाणी गोदामातील स्ट्राँग रुममध्ये आणण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने येथे त्रिस्तरीय तगडा बंदोबस्त आहे. सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यावेळी जातीने हजर होते.गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या काळात मतदारसंघातील दोन हजार केंद्रांवर ६०.३६ टक्के मतदान पार पडले. अत्यंत शांततेत व सुरळीत मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व केंद्रांवरील ईव्हीएम मतदारसंघनिहाय जमा करण्यात आले. त्यानंतर ते लोकसभा मतदारसंघाची स्ट्राँग रूम असलेल्या नेमाणी गोदामात आणण्यास सुरूवात झाली. गुरुवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत अमरावती व बडनेरा विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्राँग रूमवर पोहोचले. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत शहरालगत असलेल्या मतदान केंद्रातील ईव्हीएमही स्ट्राँग रूमवर आणण्यात आले. शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत मेळघाटसह इतर विधानसभा मतदारसंघातील केंद्रांवरील ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये पोहोचविण्यात आले. तब्बल ३४ दिवस ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सशस्त्र जवानांच्या निगराणीत राहणार आहे. ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी स्ट्राँग रूमवर तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथे सीआरपीएफ व एसआरपीएफच्या प्रत्येकी एक तुकडीसह ३ पोलीस निरीक्षक, ६ पोलीस उपनिरीक्षक व ४० कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेश बंदीही करण्यात आली आहे.सहा गोदामांची दरवाजे सिमेंट, विटांनी ‘पॅक’नेमानी गोदामात ज्या सहा गोदामात इव्हीएम ठेवण्यात आल्यात त्याचे दरवाज्याला मोठे भक्कम कुलूप लावण्यात आले व हे सर्व सहाही दरवाजे सिमेंट, विटांनी बुजविण्यात आलेत. हे काँक्रीट आता मतमोजणीच्या दिवशीच तोडण्यात येणार आहे.यांना घेता येणार सुरक्षेचा आढावानेमानी गोडाऊन येथे अमरावती लोकसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कुणालाच जायची परवानगी नाही. परंतु लोकसभा निवणुकीतील उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांना ईव्हीएम सुरक्षित आहेत काय? याचा आढावा घ्यायचा असेल तर त्यांना ते पाहता येईल. मात्र, यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019