शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

'केंद्रात मोदी नव्हे, भाजपा सरकार येणार; नितीन गडकरी पंतप्रधान होणार!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 19:10 IST

केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली

ठळक मुद्देकेंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केलीलोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेत भाजपाची सत्ता येण्याची शाश्वती कमी आहे.भाजपा आपला मुख्यमंत्री बनवू शकणार नसल्याने युतीतील शिवसेनेची ताकद वाढेल.

अमरावती - सन २०१९ च्या लोकसभेत केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली. 

लोकसभेनंतर होणाऱ्या विधानसभेत भाजपाची सत्ता येण्याची शाश्वती कमी आहे. परंतु, केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) कायम राहील. भाजपा आपला मुख्यमंत्री बनवू शकणार नसल्याने युतीतील शिवसेनेची ताकद वाढेल. त्यामुळे राजकीय क्षितिजावर बडे नेते म्हणून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे समोर येतील, अशी भविष्यवाणी गाडगे केली आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. परंतु, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा माघारण्याची जोरदार चर्चा झडत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुळापासून उखडून फेकण्याचा दावा काँग्रेस करीत असून, पाच वर्षांनंतर पुन्हा काँग्रेस सत्तेत येणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. यावर ओंकारेश्वरचे ज्योतिष विश्वविद्यालयाचे अध्यक्ष भूपेश गाडगे म्हणाले, भाजपा सत्तेत तर येईल; मात्र काही पक्षांच्या बहुमताशिवाय ते शक्य होणार नाही. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती येथे १७ जानेवारी रोजी पहिले ज्योतिष संमेलन झाले. त्यावेळी देशभरातून आलेल्या १२९ ज्योतिष्यांनी विविध विषयांवर भविष्य वर्तविले. राजकारणावरही त्यावेळी चर्चा पार पडली. 

नितीन गडकरींचे भाग्य फळफळणार

सन २०१९ मध्ये केंद्रात भाजपची सत्ता येईल. काही महिन्यांसाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान राहतील. नोव्हेंबर २०१९ नंतर मोदींची गच्छंती होऊन नितीन गडकरी यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळेल, असेही भूपेश गाडगे म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmravatiअमरावती