शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Lok Sabha Election 2019; दोन आमदार असलेल्या सभेवर भाजपचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 01:14 IST

भाजपक्षाचे दोन आमदार आणि दर्यापूरच्या नगराध्यक्ष सहभागी असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापुरातील प्रचारसभेवर भाजपक्षाच्याच तालुका पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्याची घटना निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडली.

ठळक मुद्देमुद्दा मानापमानाचा : ऐन निवडणुकीच्या तोंडवर फूट, विजयापेक्षा पदे मोठी?

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : भाजपक्षाचे दोन आमदार आणि दर्यापूरच्या नगराध्यक्ष सहभागी असलेल्या आनंदराव अडसूळ यांच्या दर्यापुरातील प्रचारसभेवर भाजपक्षाच्याच तालुका पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार घातल्याची घटना निवडणुकीच्या ऐन तोंडावर घडली.राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय असलेल्या दर्यापुरात घडलेल्या या मानापमान नाट्यामुळे जिल्ह्यातील भाजपजनांना उमेदवाराच्या विजयाऐवजी त्यांची पदे महत्त्वाची असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटात रंगली आहे.सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास अंजनगाव रोडवरील भारसाकळे यांच्या जिनिंगमध्ये भाजपा व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस युतीचे उमेदवार तथा मावळते खासदार आनंदराव अडसूळ व अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, आ. रमेश बुंदिले, नगराध्यक्ष नलिनी भारसाकळे तथा शिवसेनेचे बहुसंख्य पदाधिकारी हजर होते. मात्र, या बैठकीला भाजपचे तालुका पदाधिकारी उपस्थित नव्हते. भाजपचे तालुकाध्यक्ष विजय मेंढे, शहराध्यक्ष अनिल कुंडलवाल, भाजप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा नगरपरिषद भाजपा गटनेता असलम घानीवाले, दादा गणोरकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनय गावंडे, किरण मोकासदार व अन्य पदाधिकाऱ्यांना या बैठकीतून डावलण्यात आल्याची माहिती युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनय गावंडे यांनी दिली. भाजपच्या मुख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण नसल्यामुळे कोणीही बैठकीला गेले नाही. उशिरा रात्री ही बैठक संपल्यानंतर भाजपमध्ये फूट पडल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगली. या घटनेचे पडसाद जिल्हाभर उमटले.या बैठकीचे आयोजन प्रकाश भारसाकळे यांनी केले. बैठकीत त्यांनी त्यांच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना बोलाविले होते. भाजप आमदार म्हणून बैठकीला उपस्थित झालो.- रमेश बुंदिले,आमदार, दर्यापूरमोदी यांचे हात मजबूत करण्यासाठी जनतेला बैठकीस बोलावले होते. नगराध्यक्षांना तसा अधिकार आहे. मीसुद्धा आमदार आहे. बैठकीसाठी जिल्हाध्यक्षांची परवानगी घ्यावी काय?- प्रकाश भारसाकळे,आमदार, अकोटमला किंवा कार्यकारिणीतील कुणालाही भारसाकळे यांनी बोलाविलेल्या निमंत्रण नव्हते. त्यामुळे कुणीही बैठकीस हजेरी लावली नाही. ही बाब जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातली.- विजय मेंढे,तालुकाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019