शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

VIDEO: पाकिस्तानातून आलेलं 'ते' संकट महाराष्ट्रात; कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 21:30 IST

कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असताना राज्यावर आणखी एक संकट

अमरावती: एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलं आहे. पाकिस्तानमधून आलेले टोळ कीटक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली आहे. ताशी १२ ते १६ किलोमीटरच्या वेगाने ही टोळधाड पुढे सरकत आहे.टोळधाडीने मोर्शी तालुक्यात आक्रमण केल्यानंतर सोमवारी सकाळी वरूड तालुक्यात शिरकाव केला. पुढे इत्तमगाव, पळसवाडा, काचूर्णाकडे आगेकूच केली आहे. शेतकरी तसेच संत्रा बागायतदार शेतकरी या आकस्मिक हल्ल्यानं हादरून गेले आहेत. ही टोळधाड पालेभाज्यांसह हिरव्या वृक्षांची पानं खात आहे. लाखोंच्या संख्येनं आलेले टोळ पिकांचा फडशा पाडत असल्यानं कोट्यवधींचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही नाकतोड्याच्या गटातील तांबूस रंगाची वाळवंटी टोळ असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानातून आलेल्या टोळ किटकांनी आधी राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या पिकांवर हल्ला चढवला. या राज्यांतील अनेक जिल्ह्यांना टोळधाडीचा फटका बसला. यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं संपूर्ण राज्यात अलर्ट जारी केला. टोळधाड एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात पाकिस्तानहून राजस्थानला पोहोचली. राजस्थानातील १८ आणि मध्य प्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करुन टोळधाड उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहोचली. उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांतल्या पिकांचं टोळधाडीनं मोठं नुकसान केलं. यात आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूर आणि ललितपूरचा समावेश आहे.

उत्तर प्रदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टोळांचा मोठा झुंड एका तासामध्ये कित्येक एकरातील उभ्या पिकांचे नुकसान करु शकतो. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. आग्रामध्ये जिल्हा प्रशासनाने २०४ ट्रॅक्टर रासायनिक फवारणीसह सज्ज ठेवले आहेत. २० मे रोजी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात टोळ कीटक पाहायला मिळाले. त्यानंतर अवघ्या ५ दिवसात टोळ कीटकांनी अजमेरपासून २०० किमी अंतरावरील दौसा गाठली.कोरोनापाठोपाठ पाकिस्तानातून भारतात आलं मोठं संकट; संपूर्ण उत्तर प्रदेशात अलर्ट जारीअडकलेल्या मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला गब्बरचा सलामराज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान