शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
4
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
5
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
6
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
7
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
8
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
10
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
11
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
12
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
13
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
14
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
15
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
16
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
17
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
18
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
19
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
20
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

जलशुद्धीकरण केद्रातील कोट्यवधींचे साहित्य बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 01:03 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देपोलिसांची घटनास्थळी भेट : मजिप्रा अधिकाऱ्यांवर संशयाची सुई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलव्यवस्थापन विभागाच्या राजुरा नाका स्थित गोदामातून ८७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. रविवारी फे्रजरपुरा पोलिसांनी चौकशीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट दिली असता, तेथील सुरक्षाच वाऱ्यावर असल्याचे निदर्शनास आले. जलशुद्धीकरण केंद्राच्या कोट्यवधींच्या मुद्देमालाचा वाली कोण, असा प्रश्न या निमित्ताने उघड झाला आहे.राजुरा नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या गोदामातून चोरट्यांनी जुने वापरणीचे बेंड, टी रेड्युसर अशाप्रकारचे पाईपलाइनचे साहित्य लंपास केले. १५ नोव्हेंबरदरम्यान हा मुद्देमाल चोरी गेल्याची तक्रार अणुरेखन पदावर कार्यरत रवींद्र शेषराव ढोकणे (५५,रा.दर्यापूर) यांनी १७ नोव्हेंबर रोजी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविच्या कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. रविवारी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी जलशुद्धीकरण केंद्राच्या घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी तेथे एकही व्यक्ती उपस्थित नव्हता.कोट्यवधींचे पाईप व अन्य साहित्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा गार्डदेखील तेथे हजर नव्हते. गोदामाचे शेटर अर्धे उघडलेले होते. त्यामुळे शासनांच्या कोट्यवधींचा माल असुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. बेवारस स्थितीत पडलेल्या या साहित्यांचा वाली कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मजीप्राच्या बिनधास्तपणामुळे शासनाच्या कोट्यवधीच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.

टॅग्स :WaterपाणीPoliceपोलिस