शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बाटलीत दारु!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:00 IST

गावठी दारु मिळविण्याकरिता काही जण आपल्या सवंगड्याकरिताही प्लास्टिक बॉटलची खेप आणत आहेत. मध्य प्रदेशातून ही गावठी दारू आडमार्गाने राज्यात दाखल होत आहे. याकरिता एक खास यंत्रणा त्यांनी उभारली आहे. रस्ता पुढे क्लीअर आहे, धोका नाही, हे सांगण्याकरिता सीमावर्ती गावात त्यांनी आपले स्वयंसेवक ठेवले आहे. माहिती देणाऱ्या या स्वयंसेवकास एक मोटरसायकलमागे शंभर रुपये टीप मिळते.

ठळक मुद्देबॉटल चारशे रुपयांना : दुकाने न उघडल्यामुळे मद्यपींची निराशा

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : हातभट्टीची गावठी मोहाची दारू आता पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बॉटलमध्ये विकली जात आहे. दारूची ही बॉटल चारशे रुपयांना मिळत आहे. लॉकडाऊनमुळे या प्लास्टिक बॉटलची मागणी वाढली आहे. विदेशीवाले देशीवरून या गावठीवर आले आहे. डबकी, पावटी, बंफर, शिशा हे प्रचलित शब्द मागे पडले आहेत.गावठी दारु मिळविण्याकरिता काही जण आपल्या सवंगड्याकरिताही प्लास्टिक बॉटलची खेप आणत आहेत. मध्य प्रदेशातून ही गावठी दारू आडमार्गाने राज्यात दाखल होत आहे. याकरिता एक खास यंत्रणा त्यांनी उभारली आहे. रस्ता पुढे क्लीअर आहे, धोका नाही, हे सांगण्याकरिता सीमावर्ती गावात त्यांनी आपले स्वयंसेवक ठेवले आहे. माहिती देणाऱ्या या स्वयंसेवकास एक मोटरसायकलमागे शंभर रुपये टीप मिळते. राज्यातील मद्यपींची इच्छातृप्ती मध्यप्रदेशातीलही दारू करीत आहे. अचलपूर राजस्व उपविभागात असलेल्या अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्याचा सीमावर्ती भाग हा मध्यप्रदेश राज्याला लागून आहे. याचाच फायदा हे मद्यपी आणि मद्यविक्री करणारे उचलत आहेत. पोलीस दारू पकडत आहे. गावठी दारू व मोहाचा सडवा नष्ट करण्याची मोहीम जोरदार राबविली जात आहे. तरीदेखील गावठी दारूसह मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारुही शहरांमध्ये दाखल होत आहे. स्थानिक पोलीस धाडी टाकत असले, तरी हातभट्टीला अटकाव बसू शकला नाही.मद्यपींची निराशादारूची दुकाने उघडणार म्हणून शहरात सोमवारी सकाळपासूनच या दुकानांसमोर मद्यपींनी रांगा लावल्या होत्या. मद्यविक्री करणाºया दुकानदारांनी फिजिकल डिस्टन्सिंगची सोयही करुन ठेवली होती. अगदी शहाण्यासारखे ते पाळत आणि तोंडाला मास्क लावून अनेक मद्यपी रांगेत उभे राहलेत. दुकानदारांनी बॅरिकेड बांधण्याकरिता बासे, बल्ल्यांसह मजूरही सांगून ठेवले होते. प्रशासनाची नाराजी नको म्हणून दोघेही संयम पाळून होते. पण, ही दुकाने उघडलीच नाहीत. त्यामुळे मद्यपींची घोर निराशा झाली. मद्याकरिता रांगेत लागलेल्या काहींनी तर दुपट्ट्याने आपले पूर्ण तोंड बांधून ओळख लपविण्याचा प्रयत्नही यादरम्यान केला.जागेवर भाव कमीराज्याच्या सीमेला लागून असलेल्या भागात, जागेवर हातभट्टीच्या गावठी दारू कमी किमतीला मिळते. येथे पाण्याच्या एक लिटरच्या बॉटल स्वरूपात दारू केवळ शंभर ते दीडशे रुपयांना मिळते. शंभर ते दीडशे रुपयांची ही बिसलरी गरजूला चारशे रुपयापर्यंत विकली जाते.दुधाच्या कॅनमधून वाहतूकहातभट्टीच्या गावठी दारूची वाहतूक, तस्करी दुधाच्या कॅनमधून केली जात आहे. खाली अर्धा भागात बिसलरी आणि वर दूध, कधी पूर्ण कॅनमध्ये भरून या दारूच्या बॉटलची वाहतूक केली जाते.

टॅग्स :liquor banदारूबंदी