शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

शिलेदारांचे वर्चस्व मर्यादित

By admin | Updated: April 7, 2017 00:21 IST

जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच पहायला मिळत असली तरी प्रत्यक्षात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना

जिल्हा परिषद : साहित्य खरेदी, अनुदान थेट खात्यातजितेंद्र दखने   अमरावतीजिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच पहायला मिळत असली तरी प्रत्यक्षात अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींना खरेच अधिकार किती, असा प्रश्न आता उपिस्थत होत आहे. जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून जिल्हा परिषद ओळखली जाते. तरीही जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना बोटावर मोजण्याईतकेच अधिकार आहेत. अशातच आता बहुतांश कारभार आॅनलाईन व थेट अनुदान असल्याने झेडपीचे शिलेदार केवळ शासकीय वाहन, बंगला, शिपाई, पीए व चहा-पान खर्च एवढ्यावरच मर्यादित झाले आहेत. पूर्वी सीईओंचे गोपनीय रेकॉर्ड लिहिण्याचे अधिकार अध्यक्षांना होते. त्यामुळे सीईओ हे अध्यक्षांच्या परवानगीशिवाय मुख्यालयही सोडून जाऊ शकत नव्हते. आता हे अधिकार गोठविल्याने प्रशासन अध्यक्षांनाही जुमानत नाही. जिल्हा परिषदेतील प्रशासकीय मान्यतेची ९० टक्के प्रकरणे अध्यक्षांना माहीतच होत नाही. कोणतीही फाईल अंतिम मान्यतेसाठी मर्यादेनुसार आधी सभापती व नंतर अध्यक्षांकडे आली तरच या पदाधिकाऱ्यांबाबत प्रशासनाला नाईलाजाने का होईना सन्मान वाटू लागेल. परंतु शासनस्तरावर कोणत्याच झेडपी पदाधिकारी अथवा राजकीय पुढारी अधिकाराबाबत भांडताना दिसत नाही. सभापतीपदाच्या निवडणुकीत इच्छुकांचा हिरमोड झाला हे खरे असले तरी या पदांना सध्याच्या स्थितीत अधिकार काय हा प्रश्न उपस्थित होतो. पूर्वी समाज कल्याण आणि मबाक व कृषी विभागात शिलाई मशीन, टीनपत्रे, सायकल, मोटारपंप, बैलबंडी, सौर कंदील, ताडपत्री, लाऊडस्पिकर, पाईप आदी साहित्य खरेदी व्हायची परंतु आता ही खरेदी शासनाऐवजी स्वत: लाभार्थी करणार आहेत. कारण अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. बदलींमधील वचक संपलाशिक्षण व आरोग्य विभागात बदलींच्या प्रक्रियेत पडद्यामागून मोठ्या प्रमाणात उलाढाल होत होती. परंतु आता प्रशासकीय विनंती व बदल्या सेवाज्येष्ठतेनुसार होतात. यातही समुपदेशन होत असल्याने कुठे कोणत्या जागा रिक्त आहेत याचा तक्ताच स्क्रिनवर झळकतो. त्यामुळे बदल्यांबाबतही सभापतींचा दबदबा राहिलेला नाही.बांधकाम खात्यात बल्ले बल्लेजिल्हा परिषदेतील बांधकाम ही एकमेव समिती ‘लाभा’च्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वपूर्ण मानली जाते त्यामुळे ही समिती मिळविण्यासाठी सत्ताधारी गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या दिवसापासूनच फिल्डींग लावली आहे. ही समिती मिळाल्यास सर्व देयकांवरील टक्केवारीचे गणित सोडविणे, मर्जीतील कंत्राटदार, कार्यकर्त्यांना कामे वाटप करून सुरू ठेवणे, पर्सेन्टेंज घेऊन परस्पर कामे विकणे आदी बाबी सोयीच्या ठरू शकतात.