शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

हजारो दिव्यांंच्या लख्ख उजेडात न्हाले यावली शहीद, राष्ट्रसंतांचा जन्मोत्सव सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 22:55 IST

ग्रामजयंती महोत्सव दरवर्षी राज्यभर ३० एप्रिलला गुरुदेवभक्त उत्साहात साजरा करत असतात.

तिवसा (अमरावती) :  राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची १११ वी जयंती अर्थात ग्रामजयंती महोत्सव गुरुवारी जन्मभूमी यावली शहीद गावात पहाटे ५.३० वाजता पार पडला. गावात दिव्यांचा लखलखाट करण्यात आला. मात्र, दरवर्षी असलेली हजारोंची उपस्थिती यंदा अनुयायांनी टाळली. 

ग्रामजयंती महोत्सव दरवर्षी राज्यभर ३० एप्रिलला गुरुदेवभक्त उत्साहात साजरा करत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने घरीच राष्ट्रवंदना गाऊन ग्रामजयंती साजरी करावी, असे आवाहन गुरुदेवभक्तांना करण्यात आले आहे. जन्मभूमी यावली शहीद गावात यावर्षी कोरोनाचे सावट लक्षात घेता  केवळ पाच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत  सामाजिक अंतर राखून पहाटे ५.३० वाजता ग्रामजयंती महोत्सवाचा सोहळा पार पडला.

तत्पूर्वी गावातील लोकांनी सामाजिक अंतर राखून संपूर्ण गाव स्वच्छ करून घेतले. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या तसेच दिव्यांच्या मंद प्रकाशात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी न्हाऊन  निघाली होती. 

लढवय्यांप्रति कृतज्ञता जिवाची पर्वा न करता डॉक्टर, आरोग्य सेवक, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, पत्रकारांसोबतच जे अदृश्य हात कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत,  अशा सर्व लोकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. घरोघरी राष्ट्रासाठी प्रार्थना करून ग्रामजयंती साजरी करण्यात आली. अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाच्या राज्यात २३ हजार शाखा आहेत, हे येथे विशेष. 

महासमाधी फुलांनी सजलीगुरुकुंज मोझरी स्थित तुकडोजी महाराज यांची महासमाधी फुलांनी सजवण्यात आली होती. अनेक गुरुदेवभक्तांनी तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर समाज माध्यमांतून प्रकाश टाकला. मानवता फाउंडेशन (गुरुकुंज मोझरी) व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवक विचार मंचच्या सदस्यांनीही घरी राहून ग्रामजयंती साजरी केली.

टॅग्स :Amravatiअमरावती