शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोकांचे जीव मातीमोल-आयुक्तांचा जीव लाखमोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 01:00 IST

प्रशासकीय अप्रामाणिकपणामुळे डेंग्यूच्या मगरमिठीत अमरावतीच्या चार नागरिकांना विसावावे लागले असतानाही जरब बसावी अशी कुठलीही ठोस कारवाई महापालिका आयुक्तांनी अद्याप संबंधितांवर केली नाही.

अमरावती : प्रशासकीय अप्रामाणिकपणामुळे डेंग्यूच्या मगरमिठीत अमरावतीच्या चार नागरिकांना विसावावे लागले असतानाही जरब बसावी अशी कुठलीही ठोस कारवाई महापालिका आयुक्तांनी अद्याप संबंधितांवर केली नाही. लोकसेवक असूनही पोलिसांच्या सुरक्षेत वावरणाऱ्या आयुक्तांचा जीव लाखमोलाचा नि अमरावतीकरांचे जीव मातीमोलाचे, असाच संदेश आयुक्त संजय निपाणे यांच्या कार्यशैलीतून प्रतिबिंबित होतो आहे.डेंग्यूचा डंख अमरावतीला दोन महिन्यांपूर्वीच झाला. 'लोकमत'ने त्याबाबतचे छुपे वास्तव पुराव्यानिशी लोकदरबारात मांडले. या अत्यंत गंभीर विषयाबाबत महापालिकेने तरीही लपवाछपवी सुरूच ठेवली. आक्रमकपणे कार्यरत होण्याऐवजी न केलेल्या कामांसाठी पाठ थोपटून घेण्याचे नियोजन केले गेले आणि मग ‘..दोन दिवसांत २८ हजार गृहभेटी, घरोघरी पोहोचून जनजागृती, हजारो भांड्यांमधील पाणी केले नष्ट’ अशा बातम्या माध्यमांकडे पेरल्या गेल्या.दोन दिवसांत २८ हजार गृहभेटी देणाऱ्या महापालिका दूतांच्या परिक्रमेमुळे वस्त्या-वस्त्या ढवळून निघायला हव्या होत्या; पण तसे न घडल्याने आम्ही त्याहीवेळी शहराच्या विविध भागांतून माहिती मिळविली. तपासांती कळले की, ते दूत 'अदृश्य' स्वरूपातील होते. महापालिका आयुक्तांना मात्र त्या 'धुंवाधार' गृहभेटींचा अभिमान होता. दस्तऐवजांवर दिसणाऱ्या त्या भेटी अदृश्य असल्यामुळे त्याचा परिणाम झाला असा की, डेंग्यूच्या आॅक्टोपसने अवघे शहरच कवेत घेतले. त्यानंतरही महापालिका प्रशासन पाठ थोपटवून घेण्यातच आनंद मानत होते. महापालिका प्रशासन स्वत:च्या यशाचे ढोल बडवित असताना अमरावतीकरांच्या घरी मृत्युयात्रेची वाजंत्री वाजू लागल्यामुळे 'लोकमत'ने हा मुद्दा उचलून धरला. महापालिका आयुक्त त्यानंतर घराबाहेर निघाले. त्यांनी तीन दिवसांत १६ कंत्राटदारांवर २,३८,७०० रुपये दंड, चार स्वास्थ्य निरीक्षकांवर ८ हजार रुपये दंड, एकाची वेतनकपात आणि एकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कारवाई केली. याचाच अर्थ असा की, नागरिकांच्या आरोग्यरक्षणाच्या कर्तव्यात मोठ्या प्रमाणात कसूर करण्यात आला होता. केवळ फेरफटक्यादरम्यान आयुक्तांना कारवाईचा सपाटा लावावा लागत असेल, तर सार्वजनिक आरोग्यासंबंधी किती अनागोंदी सुरू आहे, हेही स्पष्ट व्हावे.प्रशासकीय प्रमुख या नात्याने आयुक्तांना केवळ खालच्या फळीवर कारवाईची तलवार उपसण्याऐवजी आणि लोकमरणाच्या मुद्द्यातूनही महापालिकेसाठी महसूल उभारण्याऐवजी या गंभीर विषयाच्या मुळाशी जाता येईल. त्यासाठी प्रशासकीय चौकशी आरंभता येईल. प्रथमश्रेणी अधिकाऱ्यांनी आपापली कर्तव्ये चोख बजावली आहेत काय, याची पारदर्शक चौकशी करता येईल. मुद्दा लोकांच्या जगण्यामरण्याशी संबंधित आहे. देशात 'स्वच्छ भारत अभियान' सुरू असताना अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे, कामचुकारपणामुळे महानगरातील लोक अस्वच्छतेशी निगडित कारणांनी मरत असतील, तर आयुक्तांनी ते कदापि खपवून घेता कामा नये. ज्यांच्या घरचे जीव गेलेत, त्यांच्या घरी आयुक्तांनी भेट द्यावी; त्या परिवाराच्या वेदना त्यांना तेथे कळतील. 'ज्याचे जळते, त्याला कळते', या वाक्प्रचाराचा अर्थ आयुक्तांना तेथे उमगेल. लोकांना तो कळला आहे. लोकभावना संतप्त आहेत त्या त्याचमुळे. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागण्या म्हणूनच बुलंद होताहेत. पाठ थोपटून घेण्याऐवजी दोषी अधिकाºयांना, मग ते कुठल्याही पदावर असोत, कठोर शासन करून सामान्यांचे जीवही लाखमोलाचे आहेत, असा संदेश देण्याची संधी आयुक्तांना चालून आली आहे. त्याचे सोने करता येईल.

टॅग्स :dengueडेंग्यूHealthआरोग्य