शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात उष्माघाताच्या ४६ रुग्णांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:27 IST

मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.

ठळक मुद्देफटका तापमानाचा

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मे महिन्यात तीव्र उन्हाचा फटका बसलेल्या जिल्ह्यातील ४६ रुग्णांना शासकीय रुग्णालयांत जीवनदान मिळाले. १०२ जणांचा विविध कारणांनी मृत्यू झाला.यंदा कोसळलेल्या अल्प पावसामुळे सिंचनाअभावी जमिनीतील आर्द्रता कमी झाली. मार्च एंडिंगपासूनच उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली. हवामान खात्याने एप्रिल आणि मेमध्येही अलर्ट जारी केला. लोकसभा निवडणुकीच्या उत्साहामुळे एप्रिलमध्ये उन्हाचे चटके तेवढे जाणवले नाही. मे महिन्याची सुरुवातच ‘हीट वेव्ह’ने झाला. अवघा महिनाभर ४५ ते ४६.६ अंशापर्यंत तापमान राहिले. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या काही नागरिकांना उष्माघाताचा फटका बसला. असे जिल्ह्यातील विविध भागांतून ४६ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना योग्य औषधोपचाराने बरे करून घरी पाठविण्यात आले. मात्र, काही जण अत्यवस्थेत असताना रुग्णालयात नेण्यात आल्याने त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. असे धामणगाव तालुक्यातील पाच रुग्ण, तिवसा तालुक्यातील दोन, चांदूर बाजार तालुक्यातील एक, वरूड तालुक्यातील एक व अमरावती शहरात तीन अशा १२ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालाअंती नेमके कशामुळे मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल.जिल्ह्यात महिनाभरात १०२ शवविच्छेदनयंदा उच्चांकी तापमानाचा फटका सहन न करू शकल्याने तसेच अपघातात जिल्ह्यातील १०२ जणांचा मृत्यू १ ते ३१ मे दरम्यान झाला. त्यांचा शवविच्छेदन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात करण्यात आले. मात्र, अहवाल अद्याप अप्राप्त असल्यामुळे यातील किती जण उष्माघाताचे बळी ठरले, हे निश्चत सांगणे अशक्य आहे. उष्णतेची लाट आठवडाभर असल्याने काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन आहे.उष्माघाताच्या ४६ रुग्णांवर शासकीय रुग्णालयांत यशस्वी उपचार झाला. याशिवाय काही जणांचा बाहेरच मृत्यू झाला. अशा रुग्णांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल.- श्यामसुंदर निकमजिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती