आॅनलाईन लोकमतअमरावती : डफरीन नजीकच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयाची भिंत शेणखताच्या ढिगाऱ्यामुळे कोसळून महिना लोटला. मात्र, महापालिका प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई करण्याची तसदी घेतलेली नाही.भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयाला १०० फुट लांबीची सरंक्षण भिंत आहे. या भिंतीमागे श्रीकृष्णपेठ परिसर असून, भिंतीलगत सर्व्हिस गल्ली आहे. कार्यालयाच्या भिंतीमागेच गुल्हाने नामक इसमाचे घर असल्याची माहिती विमा कंपनीच्या अधिकाºयांनी दिली. त्यांनी सर्व्हिस गल्लीत अतिक्रमण करून शेणखत साठवणूक केली आहे. अनेक वर्षांपासून असलेल्या शेणखताच्या दाबामुळे १४ आॅक्टोबर रोजी विमा कार्यालयाची ६० ते ७० फुटांची भिंत अचानक कोसळली. शेजारी पार्क केलेल्या तीन दुचाकींचे मोठे नुकसान यामुळे झाले. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.विमा कार्यालयात सततची नागरिकांची वर्दळ असते. विमा एजन्ट, हप्ता भरण्यासाठी येणारे नागरिक व अधिकाºयांचे आवागमन येथे असते. शेणखताची दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागत आहे. त्यातच उर्वरित भिंत कोसळून एखादा अपघातही होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एलआयसीकडून महापालिका आयुक्त व गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. मात्र, महापालिकेकडून अद्याप दखल घेतली गेली नाही, तर गाडगेनगर पोलीसांनी हे प्रकरण चौकशीत ठेवले आहे. भारतीय आयुवीमा महामंडळाचे व्यापक काम बघता, प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, स्वच्छ व सुंदर अमरावतीचा गवगवा करणारे महापालिका प्रशासन निद्रिस्तच असल्याचे आढळून येते.
एलआयसी कार्यालयाची भिंत कोसळून ओलांडला महिना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:18 IST
डफरीन नजीकच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालयाची भिंत शेणखताच्या ढिगाऱ्यामुळे कोसळून महिना लोटला.
एलआयसी कार्यालयाची भिंत कोसळून ओलांडला महिना
ठळक मुद्देशेणखतांचे अतिक्रमण : महापालिका प्रशासनाकडून तक्रारीची दखल नाही