शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी महाआघाडी की एकला चलो रे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:01 IST

जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय ताकद बळकट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नेमका काय अहवाल पाठवितात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या रूपाने जिल्ह्याचे नेतृत्वदेखील काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची भूमिका त्याबाबत निर्णायक राहणार आहे. काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी सुरू केल्याने महाआघाडी की एकला चलो रे, याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उत्सुकता टांगणीला लागली आहे.

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यभरातील प्रमुख राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी चालविली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्षांकडून त्या स्वबळावर लढण्याबाबत अहवाल मागविले आहेत.  काँग्रेसने स्वबळाची चाचपणी सुरू केल्याने राजकीय गोटात वातावरण तापले आहे. जिल्ह्यात काँग्रेसची राजकीय ताकद बळकट आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नेमका काय अहवाल पाठवितात, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्र्यांच्या रूपाने जिल्ह्याचे नेतृत्वदेखील काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची भूमिका त्याबाबत निर्णायक राहणार आहे. काँग्रेसची स्वबळासाठी चाचपणी सुरू केल्याने महाआघाडी की एकला चलो रे, याबाबत सर्वसामान्य कार्यकर्त्यांची उत्सुकता टांगणीला लागली आहे.

तीन आमदार काँग्रेसचे- जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. पैकी तीन काँग्रेसच्या ताब्यात आहेत.- अमरावतीची आमदारकी सुलभा खोडकेंकडे, दर्यापूरची आमदारकी बळवंत वानखडे यांच्याकडे, तर तिवस्याचे प्रतिनिधित्व पालकमंत्री यशोमती ठाकूर या करीत आहेत.

जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता१) ५९ सदस्यीय अमरावती जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २६ सदस्य आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने जिल्हा परिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. २) काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आहे. त्यांची जिल्हा परिषदेच्या राजकारणावर पकड आहे.

सर्व निवडणुका स्वबळावर लढू...

जिल्ह्यात काँग्रेस सशक्त आणि बळकट आहे. मागील सार्वत्रिक निवडणुकादेखील आम्ही स्वबळावर लढलो. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुकादेखील कुणाशीही युती, आघाडी न करता स्वबळावर लढू. - बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

लवकरच निवडणुका- जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामागोमाग महापालिका व जिल्हा परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. - महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळीदेखील सुरू झाली आहे. तेथे अनेक वर्षांनंतर काँग्रेस पक्ष विरोधी बाकावर आहे.

लोकसभेत उमेदवारच नाही- १९९१ नंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारच दिला नाही. रिपाइंचे रा.सू. गवई, त्यांचे पुत्र राजेंद्र गवई व अलीकडच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले होते. - पाठिंबा दिलेल्या उमेदवारानेच  ‘हात’ दाखविल्याने २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार   उतरविण्याची शक्यता आहे.

पंचायत समित्यांमध्ये एक नंबरजिल्ह्यात १४ पंचायत समित्या आहेत. एकूण ११८ गण आहेत. अर्ध्याअधिक पंचायत समित्यांचे सभापतिपद काँग्रेसच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी हे पद मित्रपक्षाकडे असले तरी उपसभापतिपद काँग्रेसकडे आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेस