शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

गत दोन वर्षांपेक्षा यंदा जुलैमध्ये कमी पाऊस

By admin | Updated: July 21, 2015 00:27 IST

यंदाच्या खरीप हंगामात १ जून ते २० जुलै दरम्यान केवळ २२८.३ मि.मी. पाऊस पडला.

 कोरड्या दुष्काळाचे सावट : गतवर्षी जुलैमध्ये २५२ मि.मी. पाऊसअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात १ जून ते २० जुलै दरम्यान केवळ २२८.३ मि.मी. पाऊस पडला. त्या तुलनेत सन २०१४ मध्ये जुलैअखेर ४३६ मि.मी. पाऊस झाला. २० जुलैपर्यंत १८४.४ मि.मी., तर ३१ जुलैपर्यंत या ११ दिवसांत तब्बल २५२ मि.मी. पाऊस पडला आहे. सन २०१३ मध्ये ३१ जुलैपर्यंत पावसाची सरासरी ३५३ मि. मी. अपेक्षित असताना ६१३ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. मात्र सन २०१४ मध्ये कोरडा दुष्काळ असतानाही यंदाच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्याने यंदाच्या खरीप हंगामावर कमी पावसाअभावी दुष्काळाचे सावट स्पष्ट दिसते आहे. यंदाच्या हंगामात २० जुलैपर्यंत पावसाची अपेक्षित सरासरी ३२४.४ मि. मी. असताना २२८.३ पावसाची नोंद झाली आहे. रविवार ते सोमवार सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ७.३ मि.मी. पाऊस पडला. यामध्येही धामणगाव व नांदगाव खंडेश्वर तालुक्ये निरंक राहिले आहे. तिवसा तालुक्यात केवळ ०.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. मात्र चिखलदरा तालुक्यात ४७.४ मि.मी. पाऊस झाल्याने जिल्ह्यात पावसाची सरासरी वाढली आहे. गतवर्षी २०१४ मध्ये जून महिन्यात पावसाची सरासरी १४६ अपेक्षित असताना फक्त ५० मि.मी. पाऊस पडला होता. ही केवळ ३४ टक्केवारी होती. जुलै महिन्यात २७७ मि.मी. पाऊस असताना ३८६ मि.मी. पाऊस पडला होता, ही १३९ टक्के सरासरी होती. २० ते ३१ जुलैदरम्यान दमदार पाऊस झाल्याने गतवर्षी जुलैअखेर पावसाची सरासरी वाढली होती.सन २०१३ मध्ये जून महिन्यात पावसाची अपेक्षित सरासरी १४६ मि. मी. असताना ३०२ मि.मी. पाऊस पडला, ही २०७ टक्केवारी होती. तर जुलै महिन्यात २७७ मि.मी. सरासरी पाऊस अपेक्षित असताना ३११ मि.मी. पाऊस पडला होता, याची टक्केवारी ११३ इतकी होती. या तीन वर्षांचा आढावा घेता २०१३ मध्ये जुलैअखेर झालेल्या ६१३ मि.मी. पावसाने पिके उद्ध्वस्त झाली होती. २०१४ मध्ये पावसाअभावी जिल्ह्यात कोरडा दुष्काळ होता. खरिपाची १५ नोव्हेंबरला ५० पैशांच्या आत पैसेवारी होती. तरीही यंदाच्या तुलनेत जुलैअखेर जास्त पाऊस होता. यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार २५ जुलैपर्यंत विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे. मात्र पाऊस गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने यंदाच्या खरीप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.२६ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यतामध्यप्रदेशवर असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकत आहे. येथे ६ ते ८ कि. मी. उंचीवर चक्राकार वारे आहेत. पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालयावर चक्राकार वारे असल्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा फायदा महाराष्ट्राला मिळण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत २० ते २६ जुलैदरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात पडण्याची शक्यता आहे.रविवारी ७.३ मि.मी. पाऊस जिल्ह्यात रविवारी ७.३ मि.मी. पावसाची नोंद झाली यामध्ये सर्वाधिक पाऊस चिखलदऱ्यात पडला. १९ जुलैपर्यंत पावसात माघारलेल्या या तालुक्याने एका दिवसात सरासरी भरून काढली आहे. धामणगाव, नांदगाव तालुका निरंक राहिला. अमरावती २.१, भातकुली ३.३, चांदूररेल्वे १.१, तिवसा ०.५, मोर्शी ७.५, वरूड ८.६, अचलपूर ५.५, चांदूरबाजार ५.९, दर्यापूर १.३, अंजनगाव ४.२, धारणी १४.७ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली. चांदूररेल्वे तालुक्यात सर्वात कमी पाऊस जिल्ह्यात १ जून ते २० जुलैदरम्यान २२८.३ पावसाची नोंद झाली. ही अपेक्षित सरासरीपेक्षा ९७ मि.मी. ने कमी आहे. सर्वात कमी १४३.७ मि.मी. पाऊस चांदूररेल्वे तालुक्यात पडला आहे. धामणगाव १४९.१ मि.मी., दर्यापूर १.७८ मि.मी. चांदूरबाजार १८१ मि.मी. हे यंदा सर्वात कमी पाऊस पडलेले तालुके आहेत.