लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कमी शिक्षणात चांगल्या कंपनीत आणि उत्तम पगाराची नोकरी मिळण्यासाठी अनेक जण आयटीआयला प्रवेश घेतात. राज्यभरात एकूण ३ लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यानी यासाठी नोंदणी केली आहे. यावर्षी १ लाख ४५ हजार प्रवेश क्षमतेच्या तुलनेत ही संख्या दुप्पट आहे. जिल्ह्यात १५ शासकीय आणि १४ खासगी आयटीआय आहेत. यामध्ये यंदा प्रवेशासाठी जिल्ह्यात ३ हजार ७७२ जागा शासकीय आयटीआयमध्ये आहेत.औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयटीआय अर्ज भरण्याची मुदत संपली. राज्यभर ४७० शासकीय तर ५६९ खाजगी आयटीआय आहे. त्यात एकूण १ लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नोकरीसाठी शॉर्टकट मानल्या जाणाऱ्या आयटीआयला विद्यार्थ्यांनी पसंती कायम ठेवली आहे. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत ५ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. प्रवेशासाठी एकूण पाच फेºया होणार आहेत. १ आॅगस्टपासून आॅनलाईन केंद्रीय पद्धतीने आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.विद्यार्थ्यांचा प्रतिसादशैक्षणिक क्षेत्रात कोरोनाचे संकट असतानाही विद्यार्थ्यानी आयटीआयला पसंती दिली आहे. त्यामुळे कमी कष्टात चांगली नोकरी म्हणून या अभ्यासक्रमाची लोकप्रियता कायम असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.आयटीआयमध्ये प्रवेशाची प्रक्रिया १ ते ३१ ऑगस्ट राबविण्यात आली. शनिवारी सांयकाळी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रीया राबविली जाईल.- के.एस.वानखडे,प्रवेश प्रक्रिया समन्वयक, शासकीय आयटीआय
जागा कमी अन् विद्यार्थी दुप्पट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयटीआय अर्ज भरण्याची मुदत संपली. राज्यभर ४७० शासकीय तर ५६९ खाजगी आयटीआय आहे. त्यात एकूण १ लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत नोकरीसाठी शॉर्टकट मानल्या जाणाऱ्या आयटीआयला विद्यार्थ्यांनी पसंती कायम ठेवली आहे.
जागा कमी अन् विद्यार्थी दुप्पट
ठळक मुद्देप्रवेश प्रक्रिया : ९ सप्टेंबरपासून प्रवेशाची कार्यवाही