शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख हेक्टर वनजमिनींचा प्रश्न विधिमंडळात, महालेखाकारांकडून परीक्षणाबाबत माहिती मागविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 17:00 IST

राज्यात आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाकडून परत घेण्यासाठी थेट वनसचिवांनी पुढाकार घेतला. मात्र, वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेने ती परत मिळू शकली नाही.

गणेश वासनिकअमरावती : राज्यात आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाकडून परत घेण्यासाठी थेट वनसचिवांनी पुढाकार घेतला. मात्र, वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेने ती परत मिळू शकली नाही. त्यामुळे या अतिमहत्त्वाच्या मुद्द्यावर विधान परिषद सदस्यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न मांडला आहे. यासंदर्भात इत्थंभूत माहिती मागण्यासाठी महसूल व वनविभागाने पुढाकार घेतला आहे.लोकमतने यापूर्वी राज्यातून आठ लाख हेक्टर वनजमीन गायब, वनजमिनींचा शोध सुरू, वनजमिनी परत करण्याचा महसूलला विसर राज्याच्या वनसचिवांची महसूलला तंबी, वनजमिनी परत करा अशा शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करून हा प्रश्न लोकदरबारात मांडला. दरम्यान, वनविभागाचे सचिव विकास खारगे यांनीदेखील महसूलकडे असलेली आठ लाख हेक्टर वनजमीन परत घेण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न चालविले. परंतु, महसूल विभागाची लॉबी वनविभागावर भारी पडल्याने पुन्हा वनजमिनीचा प्रश्न थंडबस्त्यात पडला. मात्र, २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विशेष बाब म्हणून ख्वाजा बेग, हेमंत टकले, आनंद ठाकूर, राहुल नार्वेकर या विधान परिषद सदस्यांनी तारांकित प्रश्न क्रमांक ४०४०६ नुसार ह्यराज्यात महसूल विभागाकडे असलेल्या वनजमिनींचे महालेखांकाराकडून परीक्षण याबत विधिमंडळात विचारणा केली आहे. त्याअनुषंगाने महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी मा.क. बनसोडे यांनी राज्यात वनविभागाला महसूलकडे असलेल्या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार काय, आठ लाख हेक्टर वनजमीन ही महसूलकडे असल्याबाबत नुकसानाला कोणते वरिष्ठ वनाधिकारी जबाबदार आहेत, याप्रकरणीे चौकशी केल्यास काही तथ्य आढळून आले काय, दोषींवर कोणती कारवाई केली, चौकशीअंती कारवाई न करण्याची कारणे कोणती अशा स्वरूपाची माहिती शासनाने प्रधान मुख्य वनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांना मागविली आहे. सदर माहिती पाठविण्याबाबचे पत्र २८ फेब्रुवारी रोजी वनविभागाकडे पाठविले असून, १ मार्च २०१८ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्याचे आदेश दिले.महसूलच्या दबावाने वनसचिवांची माघारराज्याचे वनसचिव विकास खारगे यांनी ४ आॅगस्ट २०१६ रोजी आदेश निर्गमित करून महसूलकडे ताब्यात असलेली आठ लाख हेक्टर वनजमीन विभागीय आयुक्त, जिल्हाधिका-यांनी ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत कार्यवाही करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे पाठविण्याचे कळविले होते. मात्र, महसूल विभागाची मोठी लॉबी असल्याने वनजमिनी ताब्यात देण्यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. वनसचिव खारगे यांनी महसूलकडे वनजमिनीबाबत वारंवार स्मरणपत्र दिलेत; परंतु काहीही झाले नाही. अखेर वर्षभरानंतर वनसचिवांना याप्रकरणी माघार घ्यावी लागली, हे विशेष.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषद