शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

‘प्रथमेशचा इलाज अर्ध्यावर सोडू !’

By admin | Updated: August 12, 2016 23:57 IST

तुमच्या मुलाचे प्राण वाचावे, यासाठी आम्ही इतकी धावपळ करतोेय. तुम्ही मात्र मीडियाला माहिती देता.

वडिलांना धमकी : मीडियाशी बोलण्यास मज्जाव अमरावती : तुमच्या मुलाचे प्राण वाचावे, यासाठी आम्ही इतकी धावपळ करतोेय. तुम्ही मात्र मीडियाला माहिती देता. यापुढे माहिती दिली तर प्रथमेशचा इलाज अर्ध्यावर सोडू. आम्ही पैसे लावणार नाही. तुमचे तुम्ही पाहून घ्या, अशी धमकी संस्थेच्या नागपुरातील एका पदाधिकाऱ्याने अवधूत सगणे यांना शुक्रवारी दिली.पिंंपळखुटा येथील आश्रम परिसरात इयत्ता पाचवीतील प्रथमेशचा गळा निर्घृणपणे तीन वेळा चिरण्यात आला. त्यानंतर त्याला संस्थेच्या मंडळींनी अमरावतीच्या इर्विन आणि तेथून नागपुरातील एका खासगी इस्पितळात दाखल केले. प्रथमेशवर तेथे काही दिवसांपूर्वी शल्यक्रिया करण्यात आली; तथापि जखम खोल आणि नाजूक जागी असल्यामुळे ११ वर्षीय प्रथमेशला निद्रावस्थेतच ठेवले जाते. नागपूरच्या खासगी रुग्णालयात शल्यक्रियेसाठी लागणारा खर्च शंकर महाराज यांच्या आश्रमाचे व्यस्थापन करीत आहे. आश्रमाशी जुळलेले नागपुरातील एक व्यक्ती प्रथमेशच्या वडिलांच्या संपर्कात आहेत. 'लोकमत'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानंतर प्रशासन स्तरावर गांभीर्याने कारवाई सुरू झाली. आश्रम व्यवस्थापन, वसतिगृह अधीक्षक, वसतिगृह समिती व्यवस्थापन यांची चौकशी आरंभण्यात आली. कारवाईचा फास आवळू लागल्याचे दिसताच शंकर महाराज यांच्या आश्रमाशी जुळलेल्यांनी पालकाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रथमेशच्या वडिलांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे आणि मुलगा जिवंत राहण्यासाठी पैशांची नितांत गरज असल्याचे समीकरण हेरून आश्रमहितैशी व्यक्तींकडून नेमका त्याच मर्मावर वार करण्यात आला. 'लोकमत'च्या, मातंग समाज संघटनेच्या सातत्याने संपर्कात असलेल्या नीलेशच्या वडिलांनी शुक्रवारी रात्री हा भयंकर अनुभव कथन केला. कुटुंबाचा कुलभूषण असलेला प्रथमेश परक्या शहरातील इस्पितळात बेडवर निपचित पडला आहे. तो उठावा. त्याने किमान आई-बाबा अशी हाक मारावी, या क्षणाची साऱ्या संवेदना एकवटून प्रतीक्षा करणाऱ्या त्याच्या जन्मदात्यांची स्थिती वेदनांनीही थिजावे, अशी आहे. केवळ आश्रमावर विश्वास टाकला याच कारणापायी जगण्याचे बळ गमावून बसलेल्या त्या माता-पित्यांना आश्रमाकडून शाश्वत आणि विनाशर्त आधाराची शिदोरी पुरविली जाणे हा धर्म असताना, अडवणुकीचे शस्त्र वापरून अधिकारांचे हनन केले जात आहे. हे कृत्यही गुन्हेगारी स्वरुपाचेच आहे. गळा कापण्यासाठी घडविला काय मुलगा ?गोराभरार, नजर लागावी असा देखणा, हुशार असलेल्या माझ्या मुलाला मी थापडही मारली नाही. रस्त्याने चालताना नजरा वळाव्या इतका तो देखणा. तितकाच गुणीही. तो शिकावा. मोठ्ठा व्हावा ही आमची तळमळ. त्याचसाठी त्याला पिंपळखुट्याच्या वसतिगृहात पाठविले; पण घात झाला. जपून-जपून मुलगा इतका मोठा घडविला तो कुणी गळा कापावा यासाठी काय? अशा संतप्त शब्दांत प्रथमेशच्या वडिलांनी 'लोकमत'शी बोलताना भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रथमेशची एक आठवणही त्यांनी सांगितली- एकदा त्याच्या आईसोबत तो फोटो काढण्यासाठी गेला होता. हा देखणा मुलगा कुणाचा, असा प्रश्न फोटोग्राफरने विचारला. माझा- असे त्याच्या आईने उत्तरताच, तो तुमच्यासारखा दिसत नाही, असा प्रतिप्रश्न फोटोग्राफरने केला. तो त्याच्या बाबांसारखा आहे, असे त्याच्या आईने फोटोग्राफरला अभिमानाने सांगितले. प्रथमेशचे हे कौतुक सांगताना वडिलांची छाती चार इंच फुगली होती. अचानक त्यांना प्रथमेशची स्थिती आठवली आणि त्यांचा कंठ दाटून आला.मी पाहिल्या जखमाप्रथमेशला इर्विनमध्ये आणले तेव्हा डॉक्टरांनी जखमांचे विवरण पोलिसांना दिले. निर्घृणपणे त्याचा चिरलेला गळा मी जवळून बघितला. जखमा खूप खोल आहेत. अन्ननलिकेपर्यंत कापले आहे हो... आश्रम परिसरात अनेक मुले आहेत. कुणाशीच पुन्हा असे घडू नये, प्रथमेशचे वडील भावूक झाले होते. घाबरणारा मी नव्हे !मी घाबरणारा नाही. अशिक्षितही नाही. मी सर्वांनाच पुरून उरू शकतो; पण आताशा शांत आहे, कारण- माझा प्रथमेश आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंजतो आहे. अन्यायकर्त्यांना आणि त्यासाठी कारणीभूत असलेल्या प्रत्येकाला तुरुंगात पाठवेपर्यंत मी पाठपुरावा करेनच, प्रथमेशच्या वडिलांच्या निर्धाराची धार त्यांच्या शब्दांतूनही जाणवत होती.