शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

मित्रपक्षाची मर्जी सांभाळण्यात नेत्यांची कसरत

By admin | Updated: September 8, 2014 00:57 IST

महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

अमरावती : महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीवरुन चांगलेच राजकारण तापले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या अपक्ष आणि अन्य पक्षाच्या सदस्यांची मर्जी सांभाळण्यात नेत्यांची कसरत होत असल्याचे चित्र आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी आवश्यक संख्याबळ कायम राहावे, यासाठी या सदस्याचे चोचले पुरविले जात आहे.९ सप्टेंबर रोजी महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षासोबत अपक्ष, अन्य पक्षांचे सदस्य आघाडी फ्रंट तयार करण्यात आला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने संजय खोडके यांच्या बाजूने १६ तर राष्ट्रवादी सोबत ७ सदस्य आहेत. काँग्रेस यांच्याकडे २९ सदस्य संख्या असताना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महापौरपदाचा मोह बाजूला ठेवल्याचे दिसून येते. मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला महापौर पद देण्याची तयारी काँग्रेसची आहे. त्यामुळे काँग्रेसची २९ सदस्य संख्या गृहीत धरुन राष्ट्रवादीला १५ ते १८ एवढी संख्या जुळविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादीचे नेते हे संख्याबळ जुळविण्यासाठी काही पक्षाच्या नेत्यांच्या दारीदेखील पोहचले. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत जनविकास काँग्रेस, बसपा सदस्यांची मोलाची भूमिका राहणार असल्याने राकाँ या नेत्यांच्या संपर्कात आहे. काहीही झाले तरी संजय खोडके गटाला महापौर होऊ द्यायचा नाही, अशी रणनीती आखल्याची माहिती आहे. संजय खोडके यांच्या गटातील सदस्य राष्ट्रवादीला महापौरपदाच्या निवडणुकीत सहकार्य करणार नाही, हे अपेक्षित समजूनच त्यांनी बसपा, जनविकास काँग्रेसची मदत घेण्याचे ठरविण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला जनविकास काँग्रेसने सहकार्य करावे, यासाठी रविवारी प्रमुख दोन नेत्यांमध्ये बैठक सुद्धा झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत जनविकास काँग्रेसचे सदस्य राष्ट्रवादीला सहकार्य करतील, मात्र उपमहापौरपदाच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेणार या करारावरच विद्यमान आमदार आणि माजी राज्य मंत्र्यामध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करण्यासाठी सदस्यांना रसद पुरविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.काँग्रेसने उपमहापौरपदावरच लक्ष केंद्रित करुन शहराचा राजकारणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडी करावी, हे आ. रावसाहेब शेखावत यांनी निश्चित केले आहे. मात्र महापौरपदासाठी राष्ट्रवादीचा कोणता गट संख्याबळ जुळविण्यात यशस्वी होतो, त्यानंतरच पुढील चित्र ठरविण्याची अट घातली आहे. हे संख्याबळ जुळविताना राष्ट्रवादीने महापौर पदासाठी काँग्रेसच्या परंपरागत शत्रुशी हातमिळवणी केली तर वेळेवर काही वेगळेच राजकारण करण्याची छुपी तयारी काँग्रेसची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांना मित्र पक्षाच्या सदस्यांची किमान दोन दिवस मर्जी सांभाळण्यात जणू परीक्षा असल्याचे दिसून येते. शिवसेना- भाजपच्या नेत्यांना या निवडणुकीत फार रस नसल्याचे चित्र आहे. मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत भांडणाचा काही लाभ घेता येईल काय, या जुगाळात भाजप, शिवसेनेचे नेते आहेत. काँग्रेस वगळता सत्तेचे समिकरण बसले तर काही खुर्च्यांवर कब्जा करण्याची रणनिती युतीची आहे. (प्रतिनिधी)