शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
5
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
6
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
7
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
8
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
9
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
10
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
11
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
12
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
13
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
14
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
15
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
16
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
17
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
18
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
19
DSP Chitra Kumari : कोचिंगसाठी नव्हते पैसे; वडिलांनी शिक्षणासाठी जमीन विकली, लेक २० व्या वर्षी DSP झाली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या ‘एलबीटी’त आर्थिक अफरातफर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:18 IST

स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचा नियमित भरणा केल्यानंतरही ती रक्कम प्राप्त झाल्याचे नाकारून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची गंभीर तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देमहापालिका आयुक्तांकडे तक्रार : फौजदारी गुन्हा नोंदविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचा नियमित भरणा केल्यानंतरही ती रक्कम प्राप्त झाल्याचे नाकारून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची गंभीर तक्रार महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. चालानद्वारे बँकेत भरणा केलेल्या एकूण रकमेपैकी ७६ हजार ४६५ रुपयांची संगणमत करून, खोटे हिशेब ठेवून अफरातफर केल्याने स्थानिक संस्था कर अधिकारी, लेखापाल, अंकेक्षक व अन्य जबाबदार अधिकारी कर्मचाºयांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी विनंती महापालिका आयुक्तांना सादर तक्ररीतून करण्यात आली आहे.कुळकर्णी आॅटोमोबाईल्सचे भागीदार, तुषार कुळकर्णी यांनी २५ सप्टेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाकडे ही तक्रार नोंदविली. सन २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ अशा तीन आर्थिक वर्षांचा स्थानिक संस्था कर व त्यावरील दंड म्हणून कुळकर्णी आॅटोमोबाईल्सला एकूण ५ लाख २४ हजार ३० रुपयांची नोटीस बजावण्यात आली. ही रक्कम २३ आॅगस्ट २०१८ पूर्वी भरण्याचे आदेश स्थानिक संस्था कर अधिकाºयाने दिले.कुळकर्णी यांच्या तक्रारीनुसार महापालिकेने त्यांना पाठविलेल्या त्रिवार्षिक कर भरणा नोटीसमध्ये कुळकर्णी आॅटोमोबाईल्सने सन २०१२-१३ व सन २०१४ -१५ या दोन आर्थिक वर्षात एक रुपयाही भरला नाही. सन २०१३-१४ मध्ये फक्त ४३३९ रुपयांचा भरणा केल्याचे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात आपण सन २०१२-१३ मध्ये ३१८८१ रुपये, सन २०१३-१४ मध्ये ४४,३६६ रुपये व सन २०१४-१५ मध्ये ४,५५७ रुपयांचा भरणा केला. ही रक्कम बँकेत भरल्याचा पुरावा म्हणून चालानच्या पावत्या आपल्याकडे आहेत. असे असताना एकूण रकमेपैकी ४३३९ रुपये महापालिकेला प्राप्त झाले. उर्वरित रक्कम अप्राप्त असल्याचे खोटे हिशेब ठेवून आपल्याला ५ लाख २४ हजार ३० रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला आहे. स्थानिक संस्था कर अधिकाºयांच्या मूल्यांकनानुसार, महापालिकेला चालानद्वारे बँकेत भरणा केलेल्या ८०,८०४ रुपयांपैकी केवळ ४३३९ रुपये प्राप्त झालेत. सबब, महापालिकेच्या संबंधित अधिकारी, कर्मचाºयांनी संगणमताने खोटे हिशेब दर्शवून ७६४६५ रुपयांची आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. त्याअनुषंगाने महापालिकेत मोठ्या प्रमाणात झालेल्या अफरातफर व भ्रष्टाचाराबाबत आयुक्तांनीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.एसीबीकडे तक्रारस्थानिक संस्था कर विभागातील चांडोले नामक कर्मचाऱ्यास ३० हजार रुपये लाच दिल्यास जुने हिशेब दाखविण्याची गरज नाही, अशी बतावणी करुन नोटीस बजावणाऱ्या कर्मचाऱ्याने चांडोले यांच्यावतीने लाचेची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे. लाच न दिल्यास तुमची संपत्ती जप्त करण्यात येईल, पोलीस तक्रार होऊन आपणास अटकही करण्यात येईल, अशी धमकी आपल्याला नोटीस घेतेवळी देण्यात आल्याचे कुळकर्णी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती