शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

इम्तियाज जलील यांच्यामुळे राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न

By गणेश वासनिक | Updated: March 4, 2023 19:03 IST

Amravati News राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वधर्मियांनी एकोपा ठेवावा, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देअमरावती येथे कृषी प्रदर्शनाला भेट, पाहणी 

अमरावती : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु,राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सर्वधर्मियांनी एकोपा ठेवावा, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी शनिवारी येथे केले.

ना. सत्तार यांनी अमरावती येथे आयोजित कृषी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान त्यांनी येथील शासकीय विश्रामभवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. छत्रपती संभाजीनगर येथे खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी आंदोलनात औरंगजेबाचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ना. सत्तार बोलत होते. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वांनी दक्षता घेणे काळाची गरज आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतरणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. वैयक्तिक कोणीही घेतलेला नाही. या निर्णयाची अंमलबजावणी करताना खासदार इम्तियाज जलील यांनी आंदोलन करताना या भावना जरूर जपायला पाहिजे. ज्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, ही बाब कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केली.मुस्लिम समाज हा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशीउद्धव ठाकरे यांची रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सभा आहे. या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले. यासंदर्भात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला, कुणी बोलले म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहत नाही, सर्व समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे, उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मुस्लिम समाजावर काही परिणाम होणार नाही, मुस्लिम समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही ना. सत्तार यांनी दिली.

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तार