शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एकरकमी कर्ज परतफेडीस अखेरची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 17:11 IST

नागरी सहकारी बँकांमधील थकीत कर्जासाठी एकरकमी परतफेड योजनेला शासनाने बुधवारी आदेशान्वये अखेरची संधी दिली.

गजानन मोहोडअमरावती : नागरी सहकारी बँकांमधील थकीत कर्जासाठी एकरकमी परतफेड योजनेला शासनाने बुधवारी आदेशान्वये अखेरची संधी दिली. नोटाबंदीनंतर आलेल्या मंदीतून सावरण्यासाठी योजनेला ३१ मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासाठी व्याजदर १० वरून ८ टक्क्यांवर आणला आहे.नागरी बँकांच्या अनुत्पादित (एनपीए) कर्ज खात्यांना  या सवलतीमुळे लाभ मिळणार आहे. सर्व प्रकारच्या कर्ज सवलतींना ही योजना लागू असल्याने न्यायालयीन प्रक्रियेतील किंवा कारवाई सुरू असलेल्या थकबाकीदार खातेदारांना याचा लाभ होणार आहे. मयत कर्जदारांचे खाते जर बुडीतमध्ये जात असेल, तर त्या खातेदाराच्या वारसाकडून फक्त मुद्दल वसूल करण्याची सवलत या योजनेत असल्याने अशा खातेदारांच्या वारसांनाही या योजनेचा दिलासा मिळणार आहे. योजनेची अंमलबजावणी करताना जर बँकांकडून पक्षपात होत असेल, तर खातेदारांना सवलत नाकारण्याचे लेखी कारण बँकाना द्यावे लागणार आहे.योजनेत व्याजाची आकारणी चक्रवाढऐवजी सरळ व्याज पद्धतीने होणार आहे. नागरी बँकांचे आजी-माजी संचालक, त्यांचे नातेवाइक व त्यांच्याशी संबंधित संस्थांनी ही सवलत एकवेळ घेतल्यानंतर पुन्हा पाच वर्षे अन्य योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या खातेदारांना योजनेचा लाभ नाहीगैरव्यवहार व फसवणूक प्रकरणातील कर्जे, हेतुपुररस्पर थकविलेली कर्जे,  ‘आरबीआय’च्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून वितरित कर्जेे,  शासनहमी असणारी कर्जे, न्यायालयीन प्रकरणात तडजोड करण्यात आलेल्या प्रकरणातील कर्जे, मंजूर कर्जाचा विनियोग ज्यासाठी कर्ज देण्यात आले असेल, त्यासाठी झाला नसेल अशी कर्जे आदी प्रकरणात या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अनुत्पादित खात्याला  योजनेचा लाभया योजनेत कर्जाची तात्पुरती उचल, बिल डिस्कांऊट व इतर आर्थिक सवलतींना लागू होणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया व कलम १०१ अंतर्गत वसुली आदेश प्राप्त तसेच कलम ९१ अंतर्गत निवाडे प्राप्त असलेल्या प्रकरणातही योजनेचा लाभ मिळणार आहे. समूह कर्जात जी खाते अनुत्पादित होतात, त्या खात्यांनाही एकरकमी परतफेड योजनेचा लाभ मिळणार आहे.

सरचार्ज सवलतीचाही  लाभबँकांनी वसुली केल्यानंतर खातेदारांकडून ६ टक्के सरचार्ज वसूल केला जातोमात्र एकरकम परतफेड योजनेत अशा प्रकारचा सरचार्ज भरावा लागणार नसल्याने खातेदारांना हा दिलासा आहे. शासनाने ही योजना स्थायी आदेश स्वरूपात प्रसिद्ध केल्यामुळे योजनेत कोणताही बदल करण्याचा अधिकार बँकांना राहणार नसल्याने खातेदारांना दिलासाच आहे.

टॅग्स :bankबँक