शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

मोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयाला तीन मशीन देणार

By admin | Updated: April 17, 2017 00:14 IST

झ्रजिल्ह्यात सध्या भूमापनासाठी तीन मशीन उपलब्ध आहेत. मोजणी प्रकरणांची संख्या अधिक आहे.

पालकमंत्री : तालुकास्तरावर शिबिर आयोजित करावेअमरावती : झ्रजिल्ह्यात सध्या भूमापनासाठी तीन मशीन उपलब्ध आहेत. मोजणी प्रकरणांची संख्या अधिक आहे. यामुळे जमीन मोजणी लवकर होण्यासाठी जिल्हा नियोजन समीतीतून तीन मशीन भूमिअधीक्षक कार्यालयाला देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. महाराजस्व अभियानाच्या धर्तीवर तालुकास्तरावर शिबीरांचे आयोजन १८ ते २० मे दरम्यान करण्याबाबत ही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.या बैठकीला जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी, लाचलुचपत प्रतिबंधकचे अधीक्षक महेश चिमटे, भूमिअभिलेख उपअधीक्षक मंगेश पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागातील भूमी अभिलेख कार्यालयाशी प्रलंबित संबंधित प्रकरणांची संख्या वाढत आहे. या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी उपलब्ध तीन मशीनवर कार्यभार वाढलेला होता असे चर्चेअंती लक्षात येताच बैठकीत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले.जिल्ह्यात मार्च अखेर ६५६९ प्रकरण दाखल झाली होती. पैकी ४८७६ प्रकरण निकाली निघाली असून १६९२ भूमीअभिलेख प्रकरणे प्रलंबित असल्याने पालकमंत्र्यांनी प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. प्रलंबित प्रकरणांची स्थिती काय व कोणत्या कारणाने प्रलंबित राहिले, यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जानेवारीपर्यंत शहरात भूमापनाची १८३ प्रकरणे दाखल झालीत. महापालिका क्षेत्रातील १२ नवीन गावांचा समावेश झाल्याने अतिरिक्त कामासाठी नवीन मशीनची आवश्यकता आहे. यामुळे भूमापनाचे काम गतीने होईल. जिल्ह्यातील ८० हजार मिळकतीमधील ४ ते५ हजार मिळकतीच्या रेकॉर्डमध्ये दुरूस्ती असल्याची माहिती यावेळी उपअधीक्षक भूमीअभिलेख मगेंश पाटील यांनी दिली. यावेळी समाजकल्याणचे उपायुक्त दीपक वडकुते, डेप्युटी सीईओ माया वानखडे यांच्याशी पालकमंत्र्यानी चर्चा केली.