शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या लेखापालाच्या घरात सापडले लाख रुपये, कोर्टाकडून जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 20:30 IST

अचलपूर नगरपालिकेचा लाचखोर लेखापाल संतोष बंग याला अचलपूर जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. देशपांडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.

परतवाडा (अमरावती) : अचलपूर नगरपालिकेचा लाचखोर लेखापाल संतोष बंग याला अचलपूर जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. देशपांडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालय परिसरात पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांनी एकच गर्दी केली होती.

बुधवारी दुपारी 12.30 वाजता कंत्राटदाराकडून 80 हजार रुपयांची लाच घेताना लेखापाल संतोष बंग याला लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेतील त्यांच्याच पक्षात रंगेहाथ अटक केली होती. या घटनेने पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.

न्यायालयात गर्दी, रात्र काढली दवाखान्यातलाचखोर लेखापाल संतोष बंग याला अटक करताच चौकशीदरम्यान प्रकृती खालावली, म्हणून त्याला परतवाडा शहरातील एका खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. संपूर्ण रात्र तिथे काढल्यावर गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. संतोष बंग याला भेटण्यासाठी अचलपूर नगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी आल्याने गर्दी झाली होती.  

घरात आढळली एक लाखाची रोकडलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संतोष बंग याच्या घराची झडती घेतली असता, एक लक्ष रुपयांची रोकड आढळून आली. ती त्याला सुपर कामावर देण्यात आली असून, त्याचा हिशोब देण्याचे सांगण्यात आल्याचे एसीबीचे पोलीस उपअधिक्षक गजानन पडघन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्याच्या पूर्ण मालमत्तेची चौकशी होणार असून, सदर रकमेत कुणाकुणाचा हिस्सा होता, याचाही तपास एसीबीचे अधिकारी करीत आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाCorruptionभ्रष्टाचार