अमरावती : राज्यात विविध ठिकाणी पडलेला अपुरा पाऊस, अवेळी पडलेला पाऊस यामुळे निर्माण झालेली टंचाई, यामधून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता त्यांच्या पाठिशी शासनास उभे राहता यावे यासाठी येथील अंबादेवी संस्थांच्या तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी राज्यमंत्री रणजीत पाटील उपस्थित होते. अंबादेवी संस्थानचे अध्यक्ष सुधाकर पाठक, सचिव अतुल आळशी, दीपक श्रीमाळी, विश्वस्त सुरेंद्र बोरंगे, मीना पाठक आदिंनी सुपूर्द केला. यावेळी विद्या देशपांडे, रवी कर्वे, पळसुदकर, दीपा खांडेकर, विजया गुढे, पांढरीकर, अशोक खंडेलवाल, उल्हास गपुरीकर, शैलेश पोतदार, वसंत श्रॉफ, अप्पाजी कोल्हे, नगरसेवक अजय सामदेकर, प्रदीप विश्वकर्मा, बल्लू पडोळे, नीलेश ठाकरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अंबादेवी संस्थानकडून ‘लाखां’ची मदत
By admin | Updated: October 18, 2015 00:34 IST