लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली. त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची 'ई-केवायसी'ची प्रक्रिया तूर्तास थांबविली आहे. ऑक्टोबरचा लाभही पुढील आठवड्यात दिला जाणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. जुलै २०२४ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.
योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. राज्यभरातून दोन कोटी ५६ लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. पण, सहा महिन्यांनी निकषांवर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थीची पडताळणी सुरू झाली. पहिल्यांदा चारचाकी वाहने असलेल्या महिला, केंद्र व राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांचे लाभार्थी, सरकारी नोकरदार महिला, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांचा शोध घेण्यात आला. याशिवाय चुकीचे वय दाखवून किंवा वय कमी-अधिक असताना देखील योजनेचा लाभघेणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश होता. पडताळणीनंतर राज्यातील सुमारे ४५ लाख महिलांना लाभ मिळालेला नाही. आता 'ई-केवायसी'तून ज्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त आहेत, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. या निकषांनुसार जिल्ह्यातील हजारो महिला अपात्र ठरतील, अशी शक्यता वर्तविली आहे.
"महिलांचा लाभ बंद होणार नाही. शासनाने आता प्रत्येक लाभार्थीस ई-केवायसी बंधनकारक केली आहे. योजनेच्या वेबसाईटवरील ई-केवायसी करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत. पण, लाभार्थीनी ई-केवायसी करून घ्यावी."- अतुल भंडागे, महिला व बालकल्याण अधिकारी,
Web Summary : E-KYC for the Ladki Bahin Yojana has been temporarily paused. Beneficiary verification is underway, potentially disqualifying many women due to income criteria. October benefits are delayed until next week.
Web Summary : लाडली बहन योजना के लिए ई-केवाईसी अस्थायी रूप से रोक दी गई है। लाभार्थी सत्यापन चल रहा है, संभावित रूप से कई महिलाएं आय मानदंड के कारण अयोग्य हो जाएंगी। अक्टूबर के लाभ अगले सप्ताह तक विलंबित हैं।