शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

रेल्वे प्रवाशांमध्ये मास्कचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

थर्मल स्क्रीनिंग नियमित करण्याची मागणी बडनेरा : सध्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच रेल्वे प्रवाशांमध्ये मास्कचा ...

थर्मल स्क्रीनिंग नियमित करण्याची मागणी

बडनेरा : सध्या कोरोना रुग्णांमध्ये जिल्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच रेल्वे प्रवाशांमध्ये मास्कचा अभाव, रेल्वे स्थानकावर थर्मल स्क्रीनिंगच्या अनियमिततेमुळे संसर्ग पसरू शकतो, हे नाकारता येणार नाही. रेल्वे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे.

बडनेरा रेल्वे स्थानक जिल्ह्यात वर्दळीचे व जंक्शन म्हणून परिचित आहे. येथून मोठा प्रवासी वर्ग ये-जा करीत असतो. अमरावती जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही दिवसांत प्रचंड वाढ झाली आहे. संसर्ग प्रवाशांदरम्यान पसरू शकतो. एका रेल्वेगाडीत शेकडो प्रवासी असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून ते प्रवास करीत असतात. त्यांच्यातही कोरोनाबाबत औदासीन्य असून, बहुतेक जण मास्क लावत नसल्याचे चित्र आहे.

रेल्वे प्रवाशांमधून कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी जनरल डब्यांमध्येदेखील आरक्षित तिकिटाचे नियोजन रेल्वे प्रशासनाने आखले आहे. रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होऊ नये, हादेखील त्यामागचा हेतू आहे. यामुळे गर्दी टळली तरी असले तरी मात्र बहुतांश प्रवासी मास्क न लावताच प्रवास करीत असल्याचे समोर येत आहे. बडनेरा रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग नियमित होत नसल्याची ओरड नियम पाळणाऱ्या प्रवाशांमध्ये आहे. काही रेल्वेगाड्यांच्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग होते, तर काही गाड्यांमध्ये ही सुविधा नाही. १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेस दाखल झाली तेव्हा रेल्वे स्थानकावर व बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग झाली नाही. असेच कामकाज सुरू राहिल्यास संसर्ग वाढण्यास रेल्वे स्थानकाची नक्कीच भर पडेल. रेल्वे स्थानकावर नियमित स्क्रीनिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आता रेल्वे गाड्या व प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. प्रवाशांकडून मास्कचा वापर, रेल्वे स्थानकावर प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्क्रीनिंग याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे तसेच प्रवाशांनी दक्ष राहणे गरजेचे आहे.