कुंभकर्णाला यंदा ‘सोने’ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:43+5:30

परतवाडा शहरात घडलेली घटना आणि या घटनेनंतर परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका या कुंभकर्णाला बसला आहे. दसºयापूर्वी नवरात्रीदरम्यान या कुंभकर्णालगतचा परिसर उत्साही मंडळी स्वच्छ करीत असतात. त्याला रंगरंगोटी करून त्यावर रोषणाईची व्यवस्थाही केली जाते. यंदा मात्र पहिल्यांदाच स्वच्छता, रंगरंगोटी व रोषणाई झालेली नाही.

Kumbakarna has no 'gold' this time | कुंभकर्णाला यंदा ‘सोने’ नाही

कुंभकर्णाला यंदा ‘सोने’ नाही

googlenewsNext
ठळक मुद्देरामलीला बाद : खोकलामातेच्या उत्सवावरही विरजण

अचलपूर/परतवाडा : अचलपूर शहरातील कुंभकर्णाला यंदा दसऱ्याला सोने वाहिले जाणार नाही. दरवर्षी दसºयाच्या दिवशी या कुंभकर्णाला सोने वाहण्याची परंपरागत प्रथा आहे.
परतवाडा शहरात घडलेली घटना आणि या घटनेनंतर परतवाडा, अचलपूर, सरमसपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा फटका या कुंभकर्णाला बसला आहे. दसºयापूर्वी नवरात्रीदरम्यान या कुंभकर्णालगतचा परिसर उत्साही मंडळी स्वच्छ करीत असतात. त्याला रंगरंगोटी करून त्यावर रोषणाईची व्यवस्थाही केली जाते. यंदा मात्र पहिल्यांदाच स्वच्छता, रंगरंगोटी व रोषणाई झालेली नाही.
बुंदेलपुरा परिसरात परकोटाबाहेर पारंपरिक खोकलामाता आहे. तेथे दहीभाताचं बोनं अर्पण करण्याची प्रथा आहे. अलीकडच्या काही वर्षात तेथे नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते. खोकलामातेचे स्थान कालंकामातेने घेतले. याच परिसरातील पाच दिवसीय रामलीला कार्यक्रमाला संचारबंदीचा फटका बसला असून, उत्सवावर विरजण पडले आहे.

अचलपूर शहरातही मिरवणूक नाही
शहरातील परिस्थितीच्या अनुषंगाने अचलपूर शहरातील नवदुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही देवी विसर्जन मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन त्यांनी अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांना दिले आहे.

Web Title: Kumbakarna has no 'gold' this time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dasaraदसरा