शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

कोष्टी हे हलबा-हलबी नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 11:17 IST

Amravati News काेष्टी हे हलबा किंवा हलबी नाहीत. त्यामुळे ते अनुसूचित जमातीचा लाभ घेऊ शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

ठळक मुद्दे चंद्रभान पराते जात प्रमाणपत्र प्रकरण

गणेश वासनिक

अमरावती : काेष्टी हे हलबा किंवा हलबी नाहीत. त्यामुळे ते अनुसूचित जमातीचा लाभ घेऊ शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पराते यांच्या अपिलावर हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा विभागीय पडताळणी समिती व उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय उदय ललित व अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने १० ऑगस्ट रोजी हा महत्त्वाचा निकाल दिला. (Suprim Court, Halba Halbi )

आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कावर गदा आणण्याची ओरड राज्यात होत असताना हा निकाल आला आहे. हलबा कोष्टी जात प्रमाणपत्राच्या आधारे तहसीलदारपदी नियुक्त झालेले चंद्रभान पराते यांचे प्रमाणपत्र नागपूर येथील अनुसूचित जमाती जातपडताळणी समितीने १ फेब्रुवारी २०१६ रोजी अवैध ठरविले होते. त्या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. तथापि, खंडपीठानेही ६ एप्रिल २०१६ रोजी त्यांची याचिका फेटाळली. पराते यांनी सर्वोच्च न्यायालयात दिवाणी अपील (क्र.३७०/२०१७) दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून कोष्टी हे हलबा-हलबी नाहीत, असा निर्वाळा दिला आहे.

यापूर्वीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद कटवारे प्रकरणात कोष्टी हे हलबा- हलबी नाहीत, असा निर्णय देऊन हा प्रश्न निकाली काढला होता. या निर्णयात मिलिंद कटवारे, माधुरी पाटील, जगदीश बहिरा आदी खटले तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियमांची चर्चा करण्यात आली आहे. आता सरकार काेणता निर्णय घेते, याकडे राज्यातील आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.

सरकार किंवा न्यायालयांना ’एसटी’ यादीत बदल करण्याचा अधिकार नाही

राज्य घटनेतील तरतुदीनुसार राज्य सरकार किंवा कोर्ट, न्यायप्राधिकरणाला अनुसूचित जमातीच्या यादीत बदल करण्याचा किंवा यादीबद्दल वेगळे मत देण्याचा अधिकार नाही. तसेच विशिष्ट जमात, जमाती समूह, जमात-जमाती समूह भाग राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या यादीत असल्याचा पुरावा सादर करण्यास किंवा चौकशी करण्यास परवानगी नाही. राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत एखाद्या जमातीचा समावेश करणे किंवा वगळणे हे अधिकार न्यायालयाला नसून फक्त संसदेला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले आहे.

चंद्रभान पराते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी, नागपूर येथे २४ व २५ सप्टेंबर २०२० रोजी, १३ व २३ ऑक्टोबर, २ नोव्हेंबर २०२० व ७ नोव्हेंबर २०२१ रोजी निवेदन दिले आहे. पण, अजूनही गुन्हे दाखल करण्यात आले नाही. जातपडताळणी कायद्यातील कलम १० व ११ नुसार सरकारने तत्काळ कारवाई करावी.

- शालिक मानकर, अध्यक्ष आदिवासी हलबा- हलबी समाज संघटना, गडचिरोली.

 

खुल्या प्रवर्गातून सेवेला संरक्षण

२०१३ मध्ये उच्च न्यायालयाने खुल्या प्रवर्गातून आपल्या सेवेला संरक्षण दिले आहे. त्या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही. दरम्यान, खुल्या प्रवर्गातून पदोन्नतीही देण्यात आली. हलबा जातीच्या दावा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळले असल्याने यासंदर्भात पुढे काय करायचे, यावर कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल.

- चंद्रभान पराते, उपायुक्त, नागपूर विभागीय आयुक्तालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय