शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

‘किसान सन्मान’ मिशनमोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:49 IST

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या हालचाली गतिमान : फेब्रुवारीअखेर शेतकऱ्यांच्या खाती अनुदान

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासनावारा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात आला. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर चार हजारांचा टप्पा आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सोमवारी नवे जिल्हाधिकारी शैलेश नवाल रुजू होतील. त्यानंतर ‘किसान सन्मान’ मिशन मोडवर राहणार आहे.शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूददेखील केलेली आहे. दोन हजारांचे तीन टप्पे वर्षभºयात अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. या योजनेचा पहिला टप्पा तरी या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. योजनेची घोषणा केल्याच्या तिसºया दिवशीच राज्य शासनाचे आदेश धडकले व कृषी महसूलसह जिल्हा परिषदेला २६ फेब्रुवारीपर्यंत याद्या तयार करण्याचा कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. योजनेसाठी पात्र शेतकºयांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक व बँक खात्याचा तपशील तत्काळ प्राप्त करून घेण्याची कार्यवाही युद्धस्तरावर सुरू झालेली आहे. नव्या जिल्हाधिकाºयांच्या अजेंड्यावर ही योजना राहणार आहे. कुठल्याही परिस्थितीत या महिन्याअखेर शेतकºयांच्या बँक खात्यावर दोन हजार रूपये जमा झालेच पाहिजे, असा शासनाने चंग बांधला आहे. कुठल्याही परिस्थितीत २० फेब्रुवारीपूर्वी शेतकऱ्यांची माहिती संकलित करून याद्या तयार करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आलेले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने समित्या गठीतअल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना योजनेत प्रतिशेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार इतके आर्थिक सहाय्य तीन टप्प्यात मिळणार आहे. वनहक्क कायद्यानुसार जिल्हा समितीने पात्र केलेल्या शेतकरी कुटुंबांचाही योजनेत समावेश होणार आहे. ज्या कुटुंबाचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक कमाल धारणा क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समित्या स्थापण्यात आल्या आहेत. तलाठी ग्राम समितीचे प्रमुख आहेत. सध्या या समितीचे काम जोमात सुरू झालेले आहे.मुख्य सचिवांद्वारा दोन वेळा व्हिसीद्वारे आढावाकेंद्राच्या बजेटनंतर तिसऱ्या दिवशी राज्याचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी ‘किसान सन्मान’साठी चार फेब्रुवारीला परिपत्रक जारी केले. पाच तारखेला यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, सीईओ व कृषी विभागाचे अधिकाऱ्यांची व्हिसी घेतली. सात तारखेला पुन्हा विभागीय आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांशी व्हिसीद्वारे संवाद साधला. या योजनेसंदर्भात ६ फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक व दुसऱ्याच दिवसी तालुका स्तरावर तहसीलदारांनी बैठकी घेतल्या. एकंदरीत शासनस्तरावर या योजनेविषयी अत्यंत गांभीर्याने घेतल्या जात आहे. आचारसंहितेपूर्वी या महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाणार आहे.