लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील नांदगाव पेठ व खोलापुरी गेट हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात पुरुष व एका महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.नांदगाव पेठ हद्दीतील अपहृत मुलीचे आई-वडील शेतमजुरीसाठी गेले होते. यावेळी घरी दोन मुली व एक मुलगा होता. सदर मुलीने महाविद्यालयीन प्रवेशाकरिता जात असल्याची माहिती फोनवर पालकांना दिली. काम आटोपून आई घरी आली असता, त्यांना मुलगी घरी दिसली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र, ते कुठेही मिळाली नाही. ६ मे रोजी एका अनोळखी क्रमांकावरून आई-वडिलांना कॉल आला. अस्पष्ट बोलून तो कॉल बंद झाला. त्यानंतर आई-वडिलांनी नातेवाईक व आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला, मात्र, मुलगी सापडली नाही. त्यामुळे आई-वडिलांनी नांदगाव पेठ पोलिसांत धाव घेतली.दुसरी घटना खोलापुरी गेट हद्दीतील दत्तुवाडी परिसरात घडली. प्लॉट गहाण ठेवण्यावरून पती-पत्नीत वाद झाला. पत्नी मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. पत्नीने मुलीला फूस लावून पळविले आणि आता ती बालवयातच मुलीचा विवाह लावून देईल, अशी शंका वडिलांनी तक्रारीत व्यक्त केली आहे. पोलिसांनी एका महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला.
शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:17 IST
शहरातील नांदगाव पेठ व खोलापुरी गेट हद्दीतून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात पुरुष व एका महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.
शहरातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण
ठळक मुद्देमहिला अन् अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल : नांदगाव पेठ व खोलापुरी गेट हद्दीत घटना