आॅनलाईन लोकमतअमरावती : अल्पवयीन मुलींना प्रेमजाळ्यात अडकवून पळविण्यात आल्याच्या तीन घटना शुक्रवारी शहरात उघड झाल्या. यासंदर्भात कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका तरुणासह दोन अज्ञातांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला आहे.बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचबंगला परिसरातील १७ वर्षीय मुलगी अकरावीत शिकते. शुक्रवारी शाळेत आनंद मेळावा असल्याचे सांगून ती सकाळी ७.३० वाजता घराबाहेर पडली. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंत घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. अखेर कुटुंबीयांना बडनेरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. दुसरी घटना फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील प्रबुद्धनगरात घडली. मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली.दुचाकीवरून पळविलेतिसºया घटनेत बेनोडा परिसरातील रहिवासी एक मुलगी बडनेरावरून यशोदानगर चौकापर्यंत तिच्या मैत्रिणीसोबत आॅटोरिक्षात बसून आली. आॅटोरिक्षामधून उतरताच तिला राहुल पछेल ऊर्फ खिचडा (रा. फ्रेजरपुरा)याने दुचाकीवर बसून पळवून नेले. या तिन्ही घटनेत फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:41 IST
अल्पवयीन मुलींना प्रेमजाळ्यात अडकवून पळविण्यात आल्याच्या तीन घटना शुक्रवारी शहरात उघड झाल्या.
तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण
ठळक मुद्देतक्रार : तरुणासह दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा