शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

खत्री कॉम्प्लेक्सप्रकरणी खुलासा मागविणार

By admin | Updated: September 22, 2015 00:15 IST

तहसीलनजीक बीओटी तत्त्वावर साकारलेल्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांसोबत झालेल्या...

मसुदा तयार : गाळे धारकांना बजावणार नोटीसअमरावती : तहसीलनजीक बीओटी तत्त्वावर साकारलेल्या खत्री कॉम्प्लेक्समध्ये गाळेधारकांसोबत झालेल्या नियमबाह्य करारनाम्याप्रकरणी महापालिका खुलासा मागविणार आहे. या खुलाशाचा मसुदा तयार करण्यात आला असून गाळेधारकांना नोटीस बजावली जाणार आहे.खत्री कॉम्प्लेक्स हे बीओटी तत्त्वावर साकारण्यात आले आहे. हा करारनामा सन २०२० मध्ये संपुष्टात येणार अ़ाहे. परंतु महापालिका बाजार व परवाना विभागाचे तत्कालीन अधीक्षक गंगाप्रसाद जयस्वाल यांनी फ्रेबुवारी २०१५ मध्ये ३३ गाळेधारकांना नव्याने २०१४ पर्यंत करारनामे करुन दिले आहेत. हे करारनामे नियमबाह्य असून यात जयस्वाल, कंत्राटदार खत्री यांनी बदमाशी केल्याचे प्रथमदर्शनी चौकशीत स्पष्ट झाले आहे. खत्री कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या अपहारप्रकरणी फौजदारी दाखल करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पोलिसांत धाव घेतली. मात्र, यात गाळेधारकांवर फौजदारी करणे अशक्य असल्याचे मत पोलिसांनी पत्राद्वारे महापालिकेला कळविले आहे. उपायुक्त चंदन पाटील हे स्वत: शहर कोतवाली ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले होते. एकूण ३३ जणांविरुद्ध तक्रार देत फौजदारी दाखल करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु ज्या गाळेधारकांसोबत २०४० सालापर्यंत करारनामे करुन दिलेत त्यांचे करारनामे संपुष्टात येण्यास आणखी ५ वर्षे शिल्लक असल्याचे पोलिसांना कागदपत्रांवरुन दिसून आले. त्यामुळे ही फसवणूक महापालिकेची नव्हे तर गाळेधारकांची झाली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. खत्री कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. यात दोषींवर सरसकट फौजदारी कारवाई करण्याची प्रशासनाची तयारी होती. मात्र, ही बाब तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. तरी देखील यातील बारकावे तपासण्यासाठी गाळे धारकांचे खुलासे मागविले जात आहेत.-चंदन पाटीलउपायुक्त, महापालिका.