शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचाच कांदा ठेवा जपून; बियाणे दोन हजारांवरून पाचशेवर, क्षेत्रही घटले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 23:12 IST

लागवड कमी होण्यामागे कांद्याला अपेक्षित भाव नाही. याशिवाय साठवणूक करताना वातावरणामुळे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय दरवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी आहे. त्यामुळे बियाणांची मागणी कमी झाल्याने दर आता ५०० रुपयांवर व काही दिवसांनी २०० ते ३०० रुपयांवर येण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याचे लागवडक्षेत्रात कमी येत आहे. यामुळे कांद्याच्या बियाण्याची मागणी कमी झाल्याने गतवर्षी किलोमागे दोन हजार रुपयांवर असलेले बियाणांचे भाव यंदा पाचशेवर आले आहेत. त्यामुळे यंदाचाच कांदा ठेवा जपून म्हणण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यात साधारणपणे दीड ते दोन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याचे क्षेत्र राहते. त्याच्या तुलनेत यंदा फक्त ५०० हेक्टरमध्येच कांद्यांची लागवड होण्याची शक्यता आहे. साहजिकच बियाणांची मागणी यावर्षी कमी झाली आहे. त्यामुळे उत्पादकांचे मोठे  नुकसान होण्याची शक्यता आहे. लागवड कमी होण्यामागे कांद्याला अपेक्षित भाव नाही. याशिवाय साठवणूक करताना वातावरणामुळे खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे. याशिवाय दरवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कांद्याचे नुकसान होत असल्याने यंदा शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल कमी आहे. त्यामुळे बियाणांची मागणी कमी झाल्याने दर आता ५०० रुपयांवर व काही दिवसांनी २०० ते ३०० रुपयांवर येण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

कांदा बियाण्याच्या दरात कमालीची घसरणदरवर्षी कांदा बियाणे दरात वाढ होत असते. यंदा उलट स्थिती आहे. लागवडक्षेत्र घटल्याने बियाणांची मागणी कमी झाली व गतवर्षी दोन हजार रुपयांवर असलेले बियाण्यांचा भाव आता ३०० ते ५०० रुपयांवर आलेला आहे.

गतवर्षी कांदा उत्पादक, ग्राहकांनाही फटकाकांद्याला अपेक्षित भाव मिळाला नाही. साठवणुकीचा कांदा खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

व्यापाऱ्यांना मात्र फायदासुरुवातीच्या काळात मातीमोल भावाने कांदा खरेदी केला व दर वाढल्यानंतर विक्री केल्याने व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होत असल्याचे दिसून येते. त्याच्या तुलनेत उत्पादकांना फटका बसला आहे.

नुकसानभरपाई मिळेल काय?प्रतिकूल वातावरण, पाऊस यामुळे कांद्याच्या रोपाचे मोठे नुकसान झाले आहे. दर घसरल्याने बियाणे शेतकऱ्यांकडे पडून आहे. या प्रकारात कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

कांदा लागवडीचे क्षेत्रही घटलेजिल्ह्यात साधारणपणे दीड ते दोन हजार हेक्टरमध्ये कांद्याची लागवड दरवर्षी होते. त्याच्या तुलनेत यंदा ५०० ते ८०० हेक्टरमध्येच लागवड होण्याची शक्यता आहे. कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यासह अन्य कारणांमुळे क्षेत्र कमी होत आहे. शेतकऱ्यांनी बाजाराकडेही लक्ष द्यावे. 

शेतकरी काय म्हणतात....

मागील वर्षी कांदा बियाणांना मोठी मागणी व यामुळे कमतरता होती. दोन हजारांवर दर पोहोचले होते. त्यातुलनेत यंदा बियाणे उपलब्ध आहेत, तर मागणी कमी आहे. हे गणित एखाद्या वर्षी तरी सारखे असावे.  - संजय जाजू, कृषी निविष्ठा विक्रेता

निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी पिकांची वाट लागत आहे. कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. भाव वाढतील, या अपेक्षेने साठवणूक करायची तरी कोणत्या मालाची? हा मोठा प्रश्न आहे.- संजय मालपे, शेतकरी

 

टॅग्स :onionकांदा