शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

‘सखीं’सोबत उलगडला चित्रपटाचा प्रवास

By admin | Updated: November 29, 2015 00:54 IST

‘धनगरवाडा’ या मराठी चित्रपटातील कलाकारांसह लेखक-दिग्दर्शकांनी शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांशी संवाद साधला.

अमरावती : ‘धनगरवाडा’ या मराठी चित्रपटातील कलाकारांसह लेखक-दिग्दर्शकांनी शुक्रवार २७ नोव्हेंबर रोजी ‘लोकमत सखी मंच’ सदस्यांशी संवाद साधला. स्थानिक चित्रपटगृहात ‘धनगरवाडा’चा प्रीमियर पार पडल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह संपूर्ण टिमने मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात सखींशी संवाद साधला. अलका कुबल यांचे पती तथा प्रसिद्ध सिनेछाया दिग्दर्शक समीर आठल्ये यांचा हा स्वतंत्र दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न. अलका कुबल या चित्रपटात कलावंत म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या नसल्या तरी ‘धनगरवाडा’ ही त्यांची प्रस्तुती असल्याने त्या संपूर्ण टिमबरोबर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी राज्यभर फिरताहेत. अमरावती शहरात काही भाग चित्रीत झाला म्हणूनच नव्हे, तर येथील सहकाऱ्यामुळेच धनगरवाडा पूर्णत्वास गेल्याची पावती त्यांनी दिली. सखी मंचच्या सदस्यांनी यावेळी अलका कुबल, चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आठल्ये, कलावंत वरद चव्हाण, पल्लवी पाटील, लेखक विजय दळवी यांनी चित्रपटाचा प्रवास उलगडून दाखवला. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या धनगर समाजाचे वास्तवदर्शी चित्रण या धनगरवाडात केली असल्याचे अलका कुबल यांच्यासह लेखक-दिग्दर्शकने सांगितले. उदयोन्मुख कलाकार वरद चव्हाण, पल्लवी पाटील, पूजा पवार यांनी आपापल्या भूमिकेबाबत सखींशी संवाद साधला. सखींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लोकमत सखी मंच वर्षभर सांस्कृतिक, शैक्षणिक, मनोरंजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. त्याच मालिकेला अनुसरून धनगरवाडाची संपूर्ण टीम सखींच्या भेटीला आली होती. या संवादादरम्यान ‘लोकमत’च्या ‘कालदर्शिका’ या दिनदर्शिकाचे विमोचन ‘धनगरवाडा’च्या टिमच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’चे उपप्रबंधक सुशांत दांडगे, जिल्हा प्रतिनिधी गणेश देशमुख यांचीसुद्धा उपस्थिती होती. सखी मंचच्या सदस्यांनी अलका कुबल व चित्रपटातील सर्व कलाकार, लेखकाला बोलते केले. त्यांनीही सखी सदस्यांच्या प्रश्नांना दाद दिली. सखींनी यावेळी अलका कुबल आणि टीमसोबतच ‘सेल्फी’ घेण्याचा आनंद अनुभवला. सूत्रसंचालन सखी मंचच्या संयोजिका स्वाती बडगुजर यांनी केले. यावेळी संगीता अजमिरे, अर्चना इंगोले, छाया औगड, जरिना अली, अरुणा राऊत, करूणा कदम, पद्मा खांडे, हर्षा गोरटे आदी उपस्थित होते. विद्या सरोदे यांनी आभार प्रदर्शन केले. (प्रतिनिधी)