शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

घरकामासह वेटर, नर्स, चालकाला विदेशात नोकरीची संधी : सरकार देणार प्रशिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 11:18 IST

Amravati : जर्मनी देशासोबत सामंजस्य करार, जिल्हास्तरावर पाच केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने जर्मनी येथील बाडेन, बुटेनबर्ग राज्याशी सामंजस्य करार केला आहे. यामध्ये परिचारिका, वैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा यासह सुरक्षारक्षक, वाहनचालकांपासून वेटर्स, रंगारी, सुतार, गवंडी, प्लंबर्स अशा विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाला विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विदेशी भाषेसह कुशल कौशल्याचे प्रशिक्षण, शिक्षण निःशुल्क दिले जाणार आहे.

युरोपीय देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन वुर्टेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. यानुषंगाने विविध क्षेत्रांतील १० हजार कुशल मनुष्यबळाचा पुरवठा टप्प्याटप्प्यात केला जाणार आहे, वेगवेगळ्ळ्या ३० क्षेत्रांतील व्यक्तींचा यामध्ये समावेश असेल. या क्षेत्रामध्ये कौशल्य असणाऱ्या व जर्मनीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तींनी विभागाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या लिंकवर नोंदणी करायची आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जाची छाननी करण्यात येईल. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २५ जणांची निवड करून यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांचा विजा, पासपोर्ट शासन काढून देणार आहे.

यावर करा नोंदणी शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. (https://forms.gle/1Q32ByN wp9MnHmHc7) या संकेतस्थळावर शिक्षकांना नोंदणी करावी लागणार आहे. तर जर्मनीत रोजगारासाठी तरुण तरुणींची निवड केली जाणार आहे. याकरिता https://maa.ac.in/GermanyE mployment/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे.

प्रशिक्षणासाठी जिल्ह्यात पाच केंद्रे जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हास्तरावर पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या पाचही केंद्रांवर सकाळ, संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण वर्ग चालविले जाणार आहेत.

यांना विदेशात नोकरीची संधीपरिचारिका, वैद्यकीय सहायक, प्रयोगशाळा सहायक, दंतचिकित्सा सहायक, वीजतंत्री, वाहनचालक, सुरक्षारक्षक, हॉटेल व्यवस्थापक, स्वयंपाकी, रंगारी, गवंडी, सुतार, प्लंबर, वाहन दुरुस्ती, नळ जोडणी, केअर टेकर, अशा वेगवेगळ्या ३० क्षेत्रांतील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.

जर्मन भाषेचे मिळणार धडेजर्मनी येथे काम करण्यासाठी प्रथम अट आहे ती भाषेची. त्यासोबतच राजशिष्टाचारास महत्त्व असून, त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रथम शिक्षकांना जर्मन भाषेचे धडे दिले जाणार आहेत. या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, अशा शासकीय आणि अनुदानित शाळेतील शिक्षकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

२५ जणांना संधी पहिल्या टप्प्यातजर्मन भाषा शिकविण्यासाठी जिल्हास्तरावर २५ विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे जिल्ह्यातील २५० जणांना प्रशिक्षण दिले जाईल.

"महाराष्ट्रातील विविध कौशल्य प्राप्त केलेल्या युवक-युवतींसाठी जर्मनीमधील बाडेन, बुटेनबर्ग या राज्यांत नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याकरिता एसीआरटी पुणे यांनी दिलेल्या वेबसाईटवर नोंदणी करावी, तसेच यामध्ये पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकविण्यासाठी सुलभक म्हणून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिक्षकांना जर्मन भाषेच्या तज्ज्ञांकडून प्रथम धडे दिले जाणार आहेत."-मिलिंद कुबडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, अमरावती 

टॅग्स :Amravatiअमरावती