विलासनगर मार्गावरील घटना : लाखोंचा कापूस खाकअमरावती : विलासनगर मार्गावरील नेमाणी जिनिंग प्रेसिंगला लागलेल्या भीषण आगीत लाखों रुपयांचा कापूस जळूक खाक झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.०५ वाजताच्या सुमारास घडली. अग्निशमन विभागाने तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. गोपाल सज्जनकुमार नेमाणी यांची विलासनगर मार्गावर क्वॉटन मार्केट परिसरात जिनिंग प्रेस आहे. त्या ठिकाणी कापसापासून रुईच्या गाठी तयार केल्या जातात. बुधवारी कापसाच्या गठाणी तयार करण्याचे काम सुरु असताना अचानक शॉर्टसर्किटने आग लागली. जिनिंग प्रेसचे संचालक नेमाणी यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती कळविली. काही वेळातच अग्निशमन विभागाचे फायरमन राजेंद्र यादव, हेमराज भगत, प्रेमचंद सोनकांबळे, दीपक ढोमणे, वाहनचालक मोहन तबोले, लोणारे, सैय्यद कुरेशी व आपत्कालीन विभागाचे सहा कर्मचारी पाण्याचे तीन बंब व एक टँकर घेऊन घटनास्थळी पोहचले. त्यांनी आग विझविण्याकरिता शर्तीचे प्रयत्न सुरु केले. तासाभरात तीन बंबांच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, या भीषण आगीत कापूस व मशीनसह लाखोंचा माल जळून खाक झाला. (प्रतिनिधी)
जिनिंगला भीषण आग
By admin | Updated: May 21, 2015 00:27 IST