आॅनलाईन लोकमतचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाहून परत येत असताना भरधाव जीप अनियंत्रित झाल्याने भिलखेडा शिवमंदिरानजीक दरीत कोसळली. शनिवारी सायंकाळी ४ च्या सुमारास हा अपघात घडला. यात तिघांना किरकोळ मार लागल्याची माहिती आहे.मध्यप्रदेशाच्या बैतुल येथून एमपी ४८ बीसी २९०० क्रमांकाची जीप घेऊन पर्यटक परतवाड्याकडे येत होते. भिलखेडा शिवमंदिरानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप २० फूट खोल दरीत कोसळली. मात्र, एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. जीपमध्ये आठ ते दहा पर्यटक बसल्याची माहिती असून, त्यामधील तिघांना किरकोळ मार लागला. वृत्त लिहिपर्यंत चिखलदरा पोलिसांनी चौकशी आरंभली असल्याचे सांगण्यात आले.
भिलखेडनजीक जीप दरीत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 23:05 IST
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळाहून परत येत असताना भरधाव जीप अनियंत्रित झाल्याने भिलखेडा शिवमंदिरानजीक दरीत कोसळली.
भिलखेडनजीक जीप दरीत कोसळली
ठळक मुद्देतिघे जखमी : किरकोळवर निभावले