शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
3
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
4
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
5
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
6
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
7
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
8
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
9
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
10
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
11
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
12
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
13
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
14
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
15
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
16
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
17
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
18
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
19
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
20
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट

संभ्रमाच्या गर्तेत जन-धन योजना

By admin | Updated: September 21, 2014 23:43 IST

प्रत्येक आर्थिक दुर्बल कुटुंबाचे बँकेत खाते असावे व त्याला अन्य लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने जन धन योजना सुरू केली आहे. या योजनेसंदर्भात काही संभ्रम व ग्रामीण भागात काही अफवा ऐकावयास येतात.

बँकांसमोर रांगा : दररोजच्या आर्थिक उलाढालीत बँकांचे करोडोचे नुकसानअमरावती : प्रत्येक आर्थिक दुर्बल कुटुंबाचे बँकेत खाते असावे व त्याला अन्य लाभ मिळावा यासाठी केंद्र शासनाने जन धन योजना सुरू केली आहे. या योजनेसंदर्भात काही संभ्रम व ग्रामीण भागात काही अफवा ऐकावयास येतात. या योजनेच्या लाभासाठी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्याचा थेट परिणाम राष्ट्रीयीकृत बँकांच्या दररोजच्या उलाढालीवर होत असल्याचे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. देशातील प्रत्येक व्यक्तीचे बँकेमध्ये खाते असावे, त्याने आर्थिक व्यवहार बँकेद्वारा करावा तसेच योजनेचा लाभ मिळण्यासाठी नागरिकांचे बँकेत खाते आवश्यक आहे. सद्यस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या कुठल्याही योजनेचे अनुदान रोखीने दिल्या जात नाही ते बँकांच्या द्वाराच देण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यापासून देशात जन धन योजना सुरू केली आहे. सन २०१८ पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे बँकेत खाते असावे यासाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न केले जात आहे. याविषयी प्रत्येक कुटुंबांचे सर्वेक्षणदेखील काही महिन्यांत करण्यात येणार आहे. यामध्ये कुटुंबांची सदस्य संख्या, त्यांचा बँक खाते नंबर यासह इतरही माहिती संकलीत केली जाणार आहे. जन - धन योजनेंतर्गत खातेदाराच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्याच्या परिवारास १ लाख रूपयांचा विमा देण्यात येणार असल्याचे शासनाने बँकांना कळविले आहे. तसेच खात्यावर जमा असलेल्या रकमेवर व्याज, कुठलीही अमानत रक्कम न घेता शून्य पैशावर (झिरो बॅलेन्स) खाते उघडणे, पाच हजार रूपयापर्यंत कर्जाची पत, घर खरेदी, निर्मितीसाठी कर्ज व ओव्हरड्रॉफ्ट आदी सुविधा नागरिकांना मिळणार आहेत. सुविधांचा लाभ मिळत असल्याने ज्या नागरिकांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे असेही नागरिक नव्याने खाते काढण्यासाठी बँकेत गर्दी करू लागल्याने याचा थेट परिणाम बँकेच्या दररोजच्या आर्थिक उलाढालीवर होत आहे. वास्तविक पाहता ज्यांचे बँकामध्ये खाते नाही त्याच नागरिकांनी बँकेत खाते उघडावे अश्या स्पष्ट सूचना आहे. मात्र योजनेविषयीची अधिक माहीती लोकांपर्यंत न पोहोचणे, जी माहीती त्यात संभ्रम असणे व काही अफवा यामुळे बँकांमध्ये नागरिकांच्या रांगा लागत आहे व बँकेच्या दररोजच्या आर्थिक उलाढालीत करोडो रूपयांची झळ सोसावी लागत आहे.