शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेचे कार्ड 'ईएसआयसी'मध्येही चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:04 IST

सार्वजनिक आरोग्यसेवेचा होणार विस्तार; अनेकांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिल रोजी राज्यातील कामगार विमा योजना (ईएसआयसी) अंतर्गत कार्यरत रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता केवळ नोकरी करणाऱ्या कामगारांपुरतीच मर्यादित असलेली ईएसआयसी रुग्णालये सर्वसामान्य गरीब जनतेसाठीदेखील खुली झाली आहेत.

नव्या व्यवस्थेमुळे जनआरोग्य योजनेच्या कार्डधारकांना १३५६ प्रकारच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचार मिळणार आहेत. प्रारंभी काही ईएसआयसी रुग्णालयात स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यानंतर सर्वांनाच ही सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे. 

प्रारंभी स्त्री रुग्णांना प्राधान्यया योजनेंतर्गत प्रारंभिक टप्प्यात स्त्री रुग्णांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अन्य रुग्णांनाही आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य कार्ड आवश्यकमहात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा कार्ड हे योजनेचा घेण्यासाठी आवश्यक आहे. या योजनेंतर्गत, वैध रेशन कार्ड, (पिवळे, केसरी, अंत्योदय, अन्नपूर्णा) आणि छायाचित्रासह ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना) असणे आवश्यक आहे.

१३५६ आजारांवर मोफत उपचारराज्य शासनाच्या या निर्णयामुळे आरोग्य सुविधा आता अधिक सुलभ आणि सामर्थ्यवान होणार आहेत. गंभीर आजारांवर मोफत उपचारांसह हृदयविकार, कॅन्सर, मेंदुविकार, डायलिसिस, सर्जरी, प्रसूती, शस्त्रक्रियादेखील करून घेता येणार आहेत. त्यामुळे उपेक्षित घटकाला मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये १ हजार ३५६ आजारांवर या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत. 

गरिबांचा वेळ, पैसा वाचणारखासगी रुग्णालयांपेक्षा कमी गर्दी, अधिक सुविधा आणि दर्जेदार आरोग्यसेवा गोरगरिबांना थेट मिळणार आहेत. यामुळे गोरगरीब रुग्णांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे

जागतिक आरोग्य दिनी घोषणाजागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिल रोजी शासनातर्फे ही योजना राबविण्याबाबची घोषणा करण्यात आली आहे.

कामगार रुग्णालय आता सर्वांसाठी खुलेकर्मचारी राज्य विमा निगमच्या वैद्यकीय लाभ परिषदेने या योजनेत सहभागी होण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामगार विमा रुग्णालय सर्वच घटकांना सेवा पुरविणार आहेत. दरवर्षी पात्र कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा सेवा हे उद्दिष्ट आहे.

"एकीकृत आयुष्मान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे असंख्य गरीब घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत."- डॉ. अंकिता मटाले, जिल्हा समन्वयक

टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्य