‘त्या’ वेबसाईटवरचा तो तर ऑनलाईन कुंटणखानाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:00 AM2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:01:01+5:30

अनेक शहरांच्या विशिष्ट भागात ‘चोरी चुपके’ चालणाऱ्या कुंटणखाण्याऐवजी आता अनेक जणांकडून अशा कामांसाठी ‘सर्च इंजिन’चा आधार घेतला जात आहे. प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून इंटरनेटवर विशिष्ट  लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यात अमरावतीच्या मुली म्हणून अनेकांची प्रोफाईल टाकली गेली आहेत.  कळस म्हणजे, त्यात संबंधित मुलींचे व्हॉट्सॲप व मोबाईल क्रमांक असल्याने या काळ्या धंद्यांची पाळेमुळे खूप खोलवर रुजल्याची प्रचिती येऊ लागली आहे. 

It's the online brothel on 'that' website! | ‘त्या’ वेबसाईटवरचा तो तर ऑनलाईन कुंटणखानाच!

‘त्या’ वेबसाईटवरचा तो तर ऑनलाईन कुंटणखानाच!

Next

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ऑनलाईन जगरहाटीत अनेक व्यवसाय आज संकेतस्थळावरून हाताळली जातात.  नानाविध उत्पादने संकेतस्थळाच्या भरवशावरच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. त्याला ‘कुंटणखाना’देखील अपवाद राहिलेला नाही. त्या काळ्या जगातील अनेक तस्कर, दलाल लिंक आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. आज तर शय्यासोबत करण्यासाठी इंटरनेटवरून विविध साईड सर्च केल्यास अमरावतीमध्येही ‘ऑन कॉल’ मुली मिळू शकतात, हे भयानक वास्तव उघड झाले आहे. अनेक शहरांच्या विशिष्ट भागात ‘चोरी चुपके’ चालणाऱ्या कुंटणखाण्याऐवजी आता अनेक जणांकडून अशा कामांसाठी ‘सर्च इंजिन’चा आधार घेतला जात आहे. प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून इंटरनेटवर विशिष्ट  लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यात अमरावतीच्या मुली म्हणून अनेकांची प्रोफाईल टाकली गेली आहेत.  कळस म्हणजे, त्यात संबंधित मुलींचे व्हॉट्सॲप व मोबाईल क्रमांक असल्याने या काळ्या धंद्यांची पाळेमुळे खूप खोलवर रुजल्याची प्रचिती येऊ लागली आहे. 

हनी ट्रॅपचा प्रकार : खंडणीची मागणी, फसवणुकीचीच शक्यता अधिक 

काय करू शकते सायबर पोलीस? 
अशा संकेतस्थळांची सर्व माहिती मिळविणे सायबर सेलसाठी आव्हानच आहे. सबंधित संकेतस्थळांची होस्टिंग आणि डोमेन नेम कुणाच्या नावावर नोंद केले आहे किंवा आयपी ॲड्रेसबाबत माहिती मिळविली जाऊ शकते. संबंधित वेबसाईटच्या मालकापर्यंत पोहोचणे सहज शक्य नसले तरी गुगलकडे तक्रार नोंदविल्यास संबंधित वेबसाईटवरून विशिष्ट मजकूर किंवा थेट साईडदेखील डाऊन करता येऊ शकते. सबंधित वेबसाईटची होस्टिंग परदेशात असल्यास मात्र मर्यादा येतात.

भयानकच! म्हणे, मॉडेल्सही मिळतील
‘सर्च इंजिन’वर ‘फिमेल एस्कॉर्ट’ हा शब्द सर्च केला असता, त्याठिकाणी अनेक मुलींची बोल्ड छायाचित्र असलेल्या शेकडो जाहिराती दिसून येतात. या वेबसाईटवर जवळपास सर्व मोठ्या शहरांची नावे आहेत. अगदी मॉडेल्स आणि कॉलेजच्या मुली मिळतील, असा उल्लेखदेखील यात आहेत. एखाद्या पर्यटकाला किंवा अन्य कुणालाही शय्यासोबत करण्यासाठी सर्च केल्यास संबंधित वेबसाईटच समोर येते. प्रत्येक वेबसाईटच्या लिंकवर वेगवेगळ्या मुली व महिलांची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक वेबसाईटवर वेगवेगळी माहिती आणि मोबाईल नंबर दिले आहेत. मात्र, ते फोन नंबर किती खरे न किती खोटे, हे कळू शकले नाही. 

एखाद्या मुलीची, महिलेची तक्रार आल्यास, ते प्रोफाईल डिलिट करण्यासंदर्भात संबंधित वेबसाईट वा सर्च इंजिनशी पत्रव्यवहार केला जातो. मात्र, अद्यापपर्यंत तरी अशी तक्रार सायबरकडे आलेली नाही.
- सीमा दाताळकर, ठाणेदार, सायबर पोलीस ठाणे

राहा सजग, ब्लॅकमेलिंगचा धोका
‘त्या’ विशिष्ट संकेतस्थळावर गेल्यास मुलींचे मोबाईल नंबर, व्हॉटसॲप क्रमांक दिसतात, त्यावर कॉल केल्यास फसवणूक होण्याची शक्यताच अधिक आहे. तो हनी ट्रॅप असू शकतो. त्यावर केलेला व्हिडिओ कॉल तुमच्यासाठी खंडणी मागणारा, तुम्हाला फसविणारा ठरु शकतो. त्यामुळे ‘ऑनकॉल’ प्रलोभनाला बळी न पडता सजग राहण्याची गरज आहे. त्यातील अनेक क्रमांक व प्रोफाईल फसवी असण्याचीच शक्यता अधिक आहे.

 

Web Title: It's the online brothel on 'that' website!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.