शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सुखसरी बरसल्या, शेतकरी सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 05:00 IST

वरूड तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगातच पेरणी करून घेतली.  परंतु, गेल्या आठ  दिवसापासून पाऊस आला नसल्याने पिके सुकण्याच्या अवस्थेला पोहोचली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मृगात अल्पसा पाऊस आला आणि निघून गेला. त्यानंतर तर आलाच नाही. यानंतरचे नक्षत्र कोरडे गेले. कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिके पावसाने दडी मारल्याने कोमेजू लागली. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.

ठळक मुद्देअचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव, चिखलदरा, धारणीत धुवाधार; खरीप मशागतीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  तीन आठवड्यांपासून बेपत्ता झालेला वरुणराजा गुरुवारी अनेक तालुक्यात दमदार बरसला. या सुखसरींनी बळीराजा चिंब झाला आहे.  दीर्घ प्रतीक्षेनंतर कोसळलेल्या पावसामुळे पिकांना कोमेजलेल्या पीकांना नवसंजीवनी मिळाली आहे.अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, धारणी या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसला, तर मोर्शी, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यातदेखील हलका पाऊस झाला.वरूड तालुक्यात शेतकऱ्यांनी मृगातच पेरणी करून घेतली.  परंतु, गेल्या आठ  दिवसापासून पाऊस आला नसल्याने पिके सुकण्याच्या अवस्थेला पोहोचली होती. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. परंतु, गुरुवारी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.मृगात अल्पसा पाऊस आला आणि निघून गेला. त्यानंतर तर आलाच नाही. यानंतरचे नक्षत्र कोरडे गेले. कपाशी, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिके पावसाने दडी मारल्याने कोमेजू लागली. शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. आकाशाकडे ‘आ’ वासून शेतकरी पावसाची वाट पाहत होता. काही शेतकरी दुबार पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. समाधानकारक पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. उन्हाळ्यासारखा उकाडा निर्माण होऊन त्रस्त नागरिकांनासुद्धा गारवा मिळाला. मागील तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात पेरणी धोक्यात आली. सुमारे ५० हजार हेक्टरमधील क्षेत्र प्रभावित झाले.  त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्ह्याच्या ६ ते ७ तालुक्यात दमदार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबिन बियाणे कुजायला लागले असताना गुरुवारचा पाऊस या पिकासाठी नवसंजीवनी ठरणार आहे.  शुक्रवारीदेखील पाऊस कोसळण्याची  शक्यता हवामानतज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

अचलपूर तालुक्यातसुद्धा रिमझिमपरतवाडा : आठवडाभरापासून बेपत्ता झालेला पाऊस गुरुवारी दुपारी ३ वाजता रिमझिम बरसला. काळेकुट्ट ढग, पांढरेशुभ्र धुके, अचानक सुटलेला गारवा अशा आल्हाददायक वातावरणात विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर बेपत्ता पावसाने हजेरी लावली. ३० जूनला अल्प कोसळलेला पाऊस आठवडाभरापासून बेपत्ता झाला होता. त्यानंतर गुरुवारी हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार तो आला. पेरणी आटोपल्यावर बेपत्ता झालेला पाऊस गुरुवारी दुपारी ४ वाजता रिमझिम कोसळला. जमिनीची धूप बाहेर निघाल्याने उकाडा निर्माण झाला होता. हवामान खात्याने ८ जुलैला तारीख काहीअंशी खरी ठरली. शिरव्याचा पाऊस सायंकाळपर्यंत रिमझिम हजेरी लावत होता. चातकाप्रमाणे ढगांकडे एकटक डोळे लावून बसलेल्या बळीराजाचे हास्यदेखील यामुळे परतले.

धारणी तालुक्यात पाऊसधारणी :  तालुक्यात दुपारी तीन वाजेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतकरी वर्गाने सोडला सुटकेचा नि:श्वास सोडला. गेल्या २० ते २५  दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर गुरुवारी दुपारी तीन वाजता धारणी तालुक्यात मोठ्या थाटात आगमन केले. दुपारी ३ वाजता दक्षिणेकडून आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. वृत्त लिहिपर्यंत पाऊस जोरदारपणे सुरू होता. या पावसामुळे खरीप हंगामातील  पेरणी झालेल्या आणि उगवण होऊन पानांचा बहर आलेल्या सध्याची मरणासन्न स्थिती सुधारण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती