शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ आत्महत्या नव्हे, अनैतिक संबंधातून खून; आरोपी अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2022 23:14 IST

पोलिसांचा होरा खरा ठरल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली आणि मृताचा मित्र योगेश सुभाष भाकरे (३२, रा. दिलालपूर) हा हत्येमागील सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मृत संदीपच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळल्याने तो अडसर ठरला होता. यामुळे त्याला दूर करण्याकरिता त्याला दिलालपूर शिवारातील पाथरे यांच्या शेतात दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून त्याचा दुप्पट्याने गळा आवळून खून केला, अशी कबुली योगेशने पोलिसांना दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : अनैतिक संबंध  प्रेयसीच्या पतीला माहिती झाल्याने त्या दोघांच्या आड येणाऱ्या पतीला दारू पिण्याच्या बहाण्याने शेतात बोलावून त्याचा दुप्पट्याने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या दिलालपूर शिवारात घडली. या हत्येला प्रारंभी आत्महत्येचे स्वरूप देण्यात आले होते. पोलिसांनी आरोपीला शनिवारी अटक केली. संदीप विनायकराव भाकरे (३९, रा. दिलालपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिलालपूर ते सोनोरी शिवारात त्याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी सापडला होता. त्याने विष प्राशन केल्याची फिर्याद त्याच्या नातेवाइकाने चांदूर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी प्रथम मर्ग दाखल केला. तथापि, संशय व्यक्त करीत चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयातून मृतदेह शवविच्छेदनाकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात हलविला. तेथून प्राप्त शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांचा होरा खरा ठरल्यानंतर तातडीने तपासाला सुरुवात झाली आणि मृताचा मित्र योगेश सुभाष भाकरे (३२, रा. दिलालपूर) हा हत्येमागील सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले. मृत संदीपच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध होते. त्याची माहिती कळल्याने तो अडसर ठरला होता. यामुळे त्याला दूर करण्याकरिता त्याला दिलालपूर शिवारातील पाथरे यांच्या शेतात दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून त्याचा दुप्पट्याने गळा आवळून खून केला, अशी कबुली योगेशने पोलिसांना दिली. मृत संदीपचे वडील फिर्यादी विनायक रघुनाथ भाकरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तक्रार नोंदवली असून योगेशला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार नरेंद्र पेंदोरसह पीएसआय प्रतिभा मेश्राम,  विनोद इंगळे, अजय पाथरे, श्रीकांत निंभोरकर, प्रशांत भटकर, पंकज येवले, महेश काळे, विकी दुर्णे यांनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस