शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी काढणे गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 05:00 IST

नागपूर-मुबंई या मध्य रेल्वे मार्गावर पुलगाव ते बडनेरा अशा ७० किमीवर अंतरावर चिंचोली, धामणगाव, दीपोरी, चांदूररेल्वे, मालखेड, टिमटाळा असे सहा रेल्वे फाटक येतात. दत्तापूर-धामणगाव हे जुळे शहर दोन भागात विभागल्याने सायकलधारक असो की दुचाकीचालक वा पादचारी, समोर रेल्वे गाडी येत असताना फाटक ओलांडण्याची शर्यत लागलेली असते. हीच स्थिती  चांदूर रेल्वे, चिंचोली रेल्वे फाटकाची आहे

मोहन राऊतलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : बंद रेल्वे फाटकाखालून दुचाकी, सायकल काढणे व पादचारी यापुढे जात असेल तर गुन्हा दाखल होणार आहे. सहा महिन्यात अशा १०७ कारवाया झाल्या. ७० किमीच्या अंतरात असलेल्या  सहा रेल्वे फाटकांनजीक चार वर्षांत पाच लोकांचा जीव गेला आहे. नागपूर-मुबंई या मध्य रेल्वे मार्गावर पुलगाव ते बडनेरा अशा ७० किमीवर अंतरावर चिंचोली, धामणगाव, दीपोरी, चांदूररेल्वे, मालखेड, टिमटाळा असे सहा रेल्वे फाटक येतात. दत्तापूर-धामणगाव हे जुळे शहर दोन भागात विभागल्याने सायकलधारक असो की दुचाकीचालक वा पादचारी, समोर रेल्वे गाडी येत असताना फाटक ओलांडण्याची शर्यत लागलेली असते. हीच स्थिती  चांदूर रेल्वे, चिंचोली रेल्वे फाटकाची आहे

दुचाकी होऊ शकते जप्तदुचाकी रेल्वे फाटकाच्या खाली तथा जवळ उभी केली वा रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वे पोलिसांच्या लक्षात आले, तर रेल्वे अधिनियम १५९ आणि १४७ नुसार कारवाई करण्यात येते. अशा वेळी आपली दुचाकी जप्त होऊ शकणार आहे.

१०७ जणांवर कारवाई रेल्वे फाटक बंद असताना खालून जाण्यास अनेकांची चढाओढ असते. रेल्वे पोलिसांनी अशा लोकांवर बारीक लक्ष ठेवत आतापर्यंत १०७ जणांवर कारवाई केली आहे. गुन्हा दाखल केलेल्या आरोपींना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागत आहे. 

आतापर्यंत पाच जणांचा गेला बळीनागपूर-मुंबई या मध्य रेल्वे मार्गावर दर पाऊण ते एक तासात दोन ते तीन प्रवासी तथा मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे संबंधित सहा रेल्वे फाटक किमान आठ ते दहा मिनिटे बंद असतात. एखाद्या पानठेल्यावर दहा मिनिटे फालतू वेळ घालविणाऱ्यांना रेल्वे फाटक कमी वेळेसाठीही होऊ द्यायचे नसते. लगेच दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी अतिघाई करतात. पायी, सायकलने रेल्वे फाटक ओलांडताना  मागील चार वर्षात पाच जणांचा बळी या सहा रेल्वे फाटकांनी घेतला असल्याची माहिती समोर आली आहे.

रेल्वे फाटक बंद असताना दुचाकीधारक तथा पादचारी यांच्याकडून रेल्वे फाटक ओलांडणे धोकादायक तथा कायद्याने गुन्हा आहे. यात आपला जीव जाऊ शकतो. त्यामुळे कोणीही रेल्वे फाटक बंद असताना क्रॉस करू नये.  - सी.एल. कनोजिया, निरीक्षक, आरपीएफ रेल्वे स्थानक, धामणगाव रेल्वे

 

टॅग्स :railwayरेल्वे