शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

ठाणेदार मनीष ठाकरेंच्या निलंबनाचा मुद्दा तापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 01:26 IST

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठीचे पिलर तोडण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना निलंबित करण्याच्या मागणीच्या आंदोलनाची दुसऱ्या दिवशी, गुरुवारी तीव्रता वाढली. लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी यांच्यासह ...

ठळक मुद्दे धडकी भरविणारा बंदोबस्त: भाजपचा अनुसूचित जाती मोर्चाही मैदानात

पोलीस आयुक्तांना सत्तापक्षाचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठीचे पिलर तोडण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना निलंबित करण्याच्या मागणीच्या आंदोलनाची दुसऱ्या दिवशी, गुरुवारी तीव्रता वाढली. लहुजी शक्ती सेना, भीम आर्मी यांच्यासह सत्तापक्षातील भाजप अनुसूचित जाती मोर्चानेही मैदानात दंड थोपटल्याने या मुद्द्याची व्यापकता आणि गांभीर्य आता वाढले आहे.अत्यंत वर्दळीच्या गर्ल्स हायस्कूल चौकात ठाणेदाराच्या निलंबनासाठी दोन दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलन स्थळानजीक तैनात करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त इतका तगडा आहे की, तो बघून सामान्यांच्या मनात धडकी भरू लागली आहे. नियमितपणे तेथून ये-जा करणाºया काही शाळकरी मुलांच्या मातांनी दुचाकीचा मार्गच बदलविला आहे. दंगा नियंत्रण पथक, पोलीस लॉरी, सीआर मोबाइल आणि पोलीस जीपच्या रांगा, पोलीस अधिकारी, पोलिसांचा तंबू, असे सामान्यांना भयचकित करणारे चित्र तेथे दिवसरात्र दिसते.पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी लोकशाहिरांच्या अनुयायांवर दबाव निर्माण करण्यासाठी 'खाकी'चा वापर सुरू केल्याची भावना या बंदोबस्तामुळे आंदोलकांमध्ये निर्माण झाल्याने एकूच तीव्रता वाढली आहे. सत्तापक्षाने गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन मागणी पूर्ण न केल्यास मुख्यमंत्र्यांकडे दाद मागू,असा इशाराच देऊन टाकला. लोकशाहिरांच्या अनुयायांची संख्या जिल्ह्यात अडीच लक्ष असल्याचे गणित असल्यामुळे इतर राजकीय पक्षांनीही आता या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित केले आहेअन्यथा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊसामाजिक भावना दुखावणारे व महापुरुषांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची तोडफोड करण्यास कारणीभूत असणारे गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी बुधवारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे करण्यात आली. लहुजी शक्ती सेनेने छेडलेल्या आंदोलनाला भाजप अनुसूचित जाती मोर्चाने समर्थन देत आपली मागणी बुलंद केली. या विषयावर लक्ष देऊन कारवाई करावी, अन्यथा हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल, असा इशारा भाजप अनुसूचित जाती मोर्चाने पोलीस आयुक्तांना दिला आहे. यावेळी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहर जिल्हाचे अध्यक्ष सुधीर थोरात, मुकुं द खंडारे, प्रल्हाद अंभारे, अनिल सोनटक्के, लक्ष्मण सरकटे, प्रमोद खडसे, संदीप कंधारे, रतन खंडारे, देवानंद चांदणे, विनोद थोरात, आकाश खडसे, अल्केश वानखडे, गजानन खडसे, अरुण कामनेकर, पवन राजूरकर, संजय खडसे, सचिन नाईक, सुनील थोरात आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliceपोलिसMorchaमोर्चा