शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

जलव्यवस्थापन समितीच्या सभेत गाजला लीकेजचा मुद्दा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:33 IST

जिल्ह्यातील मे ते आॅगस्ट महिन्यात ज्या ७ गावांमध्ये साथरोगाची लागण झाली, त्याला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतील पाइपलाइनचे लीकेजेस कारणीभूत ठरल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या सभेत गुरूवारी चांगलाच गाजला.

ठळक मुद्देपदाधिकारी आक्रमक : जिल्ह्यातील सात गावांमध्ये साथरोगांची लागण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील मे ते आॅगस्ट महिन्यात ज्या ७ गावांमध्ये साथरोगाची लागण झाली, त्याला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेतील पाइपलाइनचे लीकेजेस कारणीभूत ठरल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या जलव्यस्थापन समितीच्या सभेत गुरूवारी चांगलाच गाजला.जिल्हा परिषद जलव्यस्थापन समितीची सभा ४ आॅक्टोबर रोजी विविध विषयाला अनुसरून अध्यक्ष नितीन गोंडाणे यांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. यावेळी सभेत आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी जिल्ह्यातील धारवाडा, सोनापूर, सुफलवाडा, मोरचुद, येरला, लाखेवाडा आणि चोबिदा या ७ गावांमध्ये मे ते आॅगस्ट महिन्या दरम्यान ग्रॅटो, कॉलरा या साथरोगाची लागण झाली होती. दरम्यान या साथरोगाची लागण होण्याची कारणी करण्याचा मुद्दा मागील जलव्यवस्थापन समिती सभेत उपस्थित केला होता. त्यानुसार याबाबतचा अहवाला सभेच्या पटलावर प्रशासनाने ठेवला. यात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या योजनेच्या पाणी पुरवठा करणाºया पाईप लाईनचे लीकेजस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवला. त्यामुळे लीकेजेस दुरूस्तीची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न उपस्थित करीत वानखडे यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विषय तापल्याने अखेर यापुढे पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन लीकेज असल्यास ते त्वरित दुरूस्त करावे आणि आरोग्य आणि पाणी पुरवठा विभागाने समन्वयातून काम करावे अन्यथा दोषींवर कारवाई करण्याचा ठराव या सभेत पारित करण्यात आला. याशिवाय दर्यापूर मतदार संघातील १२५ गावांच्या शहानूर पाणीपुरवठा योजनेची पाईप लाईनवर नव्याने ७९ गावांना जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांना पाणीपुरवठा होत नाही. परिणामी पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. परंतु, हा अतिरिक्त भार कमी करून नव्याने उपाययोजना करण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग टाळाटाळ करीत असल्याचे बळवंत वानखडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. यावर मजीप्रा अधिकारी अपेक्षित उत्तर देऊ न शकल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश झेडपी अध्यक्षांनी मजीप्रा अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सदस्या गौरी देशमुख, वासंती मंगरोळे, पूजा हाडोळे, अनिता मेश्राम यांनी पाणीपुरवठा, सिंचन विभागाचे मुद्दे मांडलेत.सिंचन तलावात दारूची निर्मितीतिवसा तालुक्यातील धोत्रा आणि वऱ्हा गावाच्या मध्यसीमेवर दहीगाव धानोरा तलाव आहे. सध्या या तलावात पाणी नसल्यामुळे अवैध विक्रेते चक्क या तलावाच्या मध्यभागी मोठ्या थाटून दारू काढत असल्याचा मुद्दा गौरी देशमुख यांनी जलव्यस्थापन सभेत मांडला.यावर प्रशासनाने हा तलाव झेडपीचा नसून जलसंपदा विभागाचा असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान सभेला उपस्थित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पोलिसात तक्रार देवून अवैध धंदे होणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन सभागृहात दिले.पाणीटंचाईचा घेतला आढावाजिल्हाभरात कमी पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे टंचाईची झळ बसण्याची दाट शक्यता आहे. पाणी टंचाई निवारणार्थ पाणीपुरवठा विभागाने काय उपाययोजना केल्यात, असा प्रश्न गौरी देशमुख व अन्य सदस्यांनी उपस्थित केला. यावर पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी टंचाई आराखड्याच्या तयारीसाठी तालुकानिहाय बैठकी सुरू आहेत. लवकरच जिल्ह्याचा आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जाणार असल्याचे सांगितले.