लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अनिर्बंध वाहतूक, रस्त्यावरच ठाण मांडणारे हॉकर्स, ठिकठिकाणी होत असलेले अतिक्रमण याबाबत महापालिकेत महापौर कक्षात मंगळवारी बैठक घेण्यात आली. या सर्व प्रकारात आता कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश महापौर व आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार आता झोननिहाय कारवाई केली जाणार आहे.बैठकीला उपमहापौर कुसुम साहू, स्थायीचे सभापती बाळासाहेब भुयार, सभागृहनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.शहरातील चौकांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या खाद्यपदार्थ गाडीमालकांवर सिलिंडर वापरप्रकरणी कारवाईचे निर्देश देण्यात आले. एफडीएलासुद्धा पत्र देण्यात यावे. ही कारवाई सायंकाळी व्हावी. झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथक निर्माण करून त्याची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपवावी. या झोननिहाय पथकात चार पोलीस शिपाई, एक सहायक पोलीस निरीक्षक असावेत, असे ठरविण्यात आले. अनधिकृत इमारतप्रकरणी कारवाई करण्यात यावी तसेच वेळोवेळी पुरविण्यात आलेल्या सुरक्षा पथकात बदल करण्यात यावा. शहरात आठ ठिकाणी जागा निश्चित करुन आठवडी बाजार करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. शिकवणी वर्ग व शहरातील पार्किंगबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. अवैध होर्डिंगबाबत कारवाई गतिमान करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले.सेवाभावी संस्थेच्या मदतीने स्मशानभूमी विकाससेवाभावी संस्थेला सोबत घेऊन शहरातील स्मशानभूमी विकसित करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मार्च महिन्याच्या आमसभेत याविषयी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. महानगरपालिका परिसरात पार्किंगची व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश महापौर चेतन गावंडे यांनी दिले आहेत.
अतिक्रमण, हॉकर्स अन् वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 06:00 IST
शहरातील चौकांमध्ये अतिक्रमण करणाऱ्या खाद्यपदार्थ गाडीमालकांवर सिलिंडर वापरप्रकरणी कारवाईचे निर्देश देण्यात आले. एफडीएलासुद्धा पत्र देण्यात यावे. ही कारवाई सायंकाळी व्हावी. झोननिहाय अतिक्रमण निर्मूलन पथक निर्माण करून त्याची क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपवावी. या झोननिहाय पथकात चार पोलीस शिपाई, एक सहायक पोलीस निरीक्षक असावेत, असे ठरविण्यात आले.
अतिक्रमण, हॉकर्स अन् वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर
ठळक मुद्देमहापालिकेत बैठक : आता झोननिहाय कारवाईचा तडाखा