दुचाकी अपघातात इसम जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:05 AM2021-01-24T04:05:49+5:302021-01-24T04:05:49+5:30

अमरावती : दुचाकींच्या धडकेत त्यावरील स्वार रस्त्यावर कोसळून जखमी झाला. बडनेरा मार्गावर मंत्री मोटर्ससमोर १७ जानेवारी रोजी ही घटना ...

Ism injured in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात इसम जखमी

दुचाकी अपघातात इसम जखमी

Next

अमरावती : दुचाकींच्या धडकेत त्यावरील स्वार रस्त्यावर कोसळून जखमी झाला. बडनेरा मार्गावर मंत्री मोटर्ससमोर १७ जानेवारी रोजी ही घटना घडली. आशिष विनायकराव इंगळे (४२, रा. साईनगर ) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवरून दुचाकी (एमएच २७ बीपी ५५५२) चालकाविरुद्ध शुक्रवारी गुन्हा नोंदविला.

----------

कमेला ग्रऊंड येथे जुगार पकडला

अमरावती : नागपुरीगेट ठाणे हद्दीतील कमेला ग्रऊंड येथे पोलिसांनी कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. महेश रामदास यादव (३८, रा. जेवडनगर), मोहम्मद अकील मोहम्मद शफी (३६, रा. ताजनगर नं. २) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली असता, सट्टापट्टी आढळली.

------------------------------------------------------------------------------

गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या

बडनेरा : प्रकाश श्रीराम भालेराव (६१, रा. पाच बंगला, जुनी वस्ती) या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

------------------------------------------------

जिल्हा स्टेडियमच्या पार्किंगमधून सायकल चोरी

अमरावती: येथील जिल्हा स्टेडियमच्या पार्किंगमधून १५०० रुपये किमतीची सायकल अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली.

संतोष मोतीराम ठाकूर (५०, रा. विलासनगर) यांनी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली.

-------------------------------------------------------------------------------

आयटीआय वर्कशॉपमधून मोबाईल लंपास

अमरावती: येथील शासकीय आयटीआयच्या वर्कशॉपमधून दोन विद्यार्थिनींचे २० हजार ४०० रुपये किमतीचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी मुलींच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

Web Title: Ism injured in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.