शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण बदलामुळे दिग्गज नेत्यांचे भवितव्य धोक्यात आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 16:08 IST

जिल्हा परिषद निवडणुकीकडे अनेक दिग्गजांचे लागले लक्ष : मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे ११८ गण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मागील निवडणुकीतील आरक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलून नव्या चक्राक्रमाने आरक्षण राखीव केले जाईल, ज्यामुळे अनेक गट आणि गणांमध्ये आरक्षण बदलण्याची शक्यता आहे. यामुळे दिग्गज नेत्यांचे राजकीय भविष्य धोक्यात येऊ शकते आणि राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत ५९ गट आहेत, ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि महिलांसाठी आरक्षण आहे. नवीन आरक्षण धोरणामुळे राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गती घेत आहेत.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ नुसार सुधारित मतदार संघाची हद्द निश्चित करण्यात आली आहे. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेचे ५९ गट व पंचायत समितीचे ११८ गण होते. या निवडणुकीत गटांची संख्या व गणामध्ये बदल होईल, अशी अपेक्षा होती. परंतु हीच स्थिती कायम ठेवली आहे. यावेळी आरक्षणाला शून्यापासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत आरक्षित असलेल्या अनेक जागा बदलू शकतात. जे गट मागच्या निवडणुकीत विविध प्रवर्गासाठी राखीव होते. त्यातही आता बदल होण्याची शक्यता आहे.

राजकीय समीकरणांमध्ये होणार उलथापालथ

जिल्हा परिषदेचे १४ तालुक्यात ५९ गट असून यावेळी आरक्षण बदलची शक्यता असल्यामुळे संभाव्य बदलामुळे नेत्यांची राजकीय गणिते विस्कळीत होणार आहेत. ज्याची विशिष्ट सर्कल लक्षात घेऊन तयारी केली होती, त्यांना आता नव्या सर्कलची वाट धरावी लागणार आहे. काही नेत्यांच्या गडातच आरक्षणाची कुन्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

आरक्षणाचे धोरण बदलाचा फटका

राज्याच्या ग्रामविकास विभागाने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी गट व गणांच्या आरक्षणाची आतापर्यंत सुरू असलेली आरक्षण सोडतीची पध्दत बदलून चक्राक्रमानुसार आरक्षण सोडत काढण्याबाबत नव्याने निर्णय घेऊन याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. 

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliticsराजकारणZP Electionजिल्हा परिषदzpजिल्हा परिषद